दहशतवादी हल्ल्यात प्रियकराच्या शर्थीने वाचले प्रेयसीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:37 PM2017-10-06T15:37:26+5:302017-10-06T16:38:07+5:30

लॉस एंजलिसला लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नुकताच हल्ला झाला होता. त्या लाईव्ह कॉन्सर्टला हे जोडपेही गेले होते. तेव्हा अचानक झालेल्या या हल्ल्यात त्याने दाखवलेल्या हिंमतीमुळेच त्याची प्रेयसी आज जिवंत आहे.

Pran's life has been read by a man in a terrorist attack | दहशतवादी हल्ल्यात प्रियकराच्या शर्थीने वाचले प्रेयसीचे प्राण

दहशतवादी हल्ल्यात प्रियकराच्या शर्थीने वाचले प्रेयसीचे प्राण

Next
ठळक मुद्देगाण्याचा आनंद लुटत असतानाच अचानक गोळीबार सुरु झाला. तेथे असलेला जमाव अंदाधुंद पळु लागला. सुरुवातीला हे काय चाललंय ते कुणालाच कळलं नव्हतंदरम्यान कर्ल्बस्टनला क्रिस्टिनची फार चिंता लागून राहिली होती. तो सतत तिच्या निद्रित मुद्रेकडे आणि निश्चल देहाकडे बघत होता. तिचा श्वासोच्छवास चालु ठेवण्याचा आणि बोलतं ठेवण्याचा प्रयत्न करत होता. 

कॅलिफोर्निया : लास वेगासच्या हल्ल्यात जखमी प्रेयसीचे प्राण वाचवण्यासाठी प्रियकराने आपल्या प्राणांची शर्थ लावली. ही घटना खरंच एखाद्या चित्रपटाचा कथेला शोभेशी आहे.

अमेरिकेतील लास वेगास येथे एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नुकताच हल्ला झाला होता. त्या लाईव्ह कॉन्सर्टला हे जोडपेही गेले होते. तेव्हा अचानक झालेल्या या हल्ल्यात त्याने दाखवलेल्या हिंमतीमुळेच त्याची प्रेयसी आज जिवंत आहे.

क्रिस्टीन किटकॅट आणि कॅले कर्ल्बस्टन हे जोडपं लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्याचा आनंद लुटत असतानाच अचानक गोळीबार सुरु झाला. तेथे असलेला जमाव अंदाधुंद पळु लागला. सुरुवातीला हे काय चाललंय ते कुणालाच कळलं नव्हतं. कर्ल्बस्टनही गोंधळलेला होता. थोड्यावेळाने त्याने प्रेयसीला त्याच्या दिशेने येताना पाहिलं. तेव्हा तिला नीट श्वासही घेता येत नव्हता. नंतर आपली प्रेयसी क्रिस्टिन हिच्या छातीला गोळी लागलीय हे पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या जखमेतून प्रचंड रक्तप्रवाह सुरु होता. 

तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले आणि तिला तात्काळ अँब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं. तिकडे आधीच बरेच जखमी होते जे उपचारांची वाट पाहत होते. क्रिस्टिनवर वेळेत उपचार होतील की नाही, असा प्रश्न कर्ब्लस्टनला पडला होता. तिच्या छातीत लागलेल्या गोळीच्या जखमेतून येणारं रक्त थांबतच नव्हतं. तिथूनच एक ट्रक काही जखमींना रुग्णालयात नेत असल्याचे त्याने पाहिले आणि त्यात क्रिस्टिनला ठेवलं. चालकानेही तो ट्रक जवळच्याच गल्लीतून चोरला होता. चोरलेल्या या ट्रकने जवळपास ३० जखमींना जीवनदान दिलं.

दरम्यान कर्ल्बस्टनला क्रिस्टिनची फार चिंता लागून राहिली होती. तो सतत तिच्या निद्रित मुद्रेकडे आणि निश्चल देहाकडे बघत होता. तिचा श्वासोच्छवास चालु ठेवण्याचा आणि बोलतं ठेवण्याचा प्रयत्न करत होता. 

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी एका यशस्वी शस्त्रक्रियेने तिच्या छातीतून गोळी बाहेर काढली. मात्र या गोळीमुळे तिच्या छातीत आणि फुस्फुसात ४ छिद्र निर्माण झाली होती. छातीत गोळी चार छिद्र होऊनही तिचं जिवंत असणं म्हणजे केवळ एक चमत्कार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. रक्तस्त्राव तर प्रचंड झाला होता शिवाय शरीराच्या इतर अवयवांवरही याचा प्रचंड परिणाम झाला होता. वेळेत उपचार मिळाले नसते तर कदाचित ती वाचू शकली नसती.

क्रिस्टिन जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने सर्वात आधी कर्ल्बस्टनच्याच नावाचा जप सुरू केला होता. खरंतर त्याच्यामुळेच ती मृत्यूच्या दाढेतून परत आली होती. 

कलर्बस्टन हा स्वतः अग्निशमन दलात कार्यरत आहे, त्यामुळे अशा आणिबाणीच्या प्रसंगात काय करायचं याची त्याला चांगलीच माहिती होती. शिवाय या दलात असल्यामुळेच मी आज माझ्या प्रेयसीचे प्राण वाचवू शकलो असं कर्ब्लस्टन अभिमानाने सांगतो.

तो पुढे कळवळीने म्हणाला की, ‘या हल्ल्यात तिलाच कशी गोळी लागली. मी कसा सुखरुप राहीलो.  तिच्यापेक्षा मला गोळी लागली असती तर तिला असा त्रास तरी सहन करावा लागला नसता. आपण येणाऱ्या प्रत्येक प्रसंगासाठी आपण सावध असलं पाहिजे.  मात्र अशी दुर्दैवी घटना कोणाबाबत घडता कामा नये.’

क्रिस्टिनच्या संपूर्ण उपचारासाठी जवळपास ८९ हजार डॉलर एवढा मोठा खर्च येणार आहे. एकट्या क्रिस्टिनच्या कुटुंबाला एवढा खर्च पेलवणं कठीण आहे. म्हणून तिच्या मित्र-मैत्रिणींनी एकत्र येत एक पेज तयार केले असून त्यामार्फत ते तिच्या उपचारांसाठी पैसे गोळा करत आहेत. क्रिर्ल्बस्टन हा खरंच हिरो आहे आणि त्याच्या तत्परतेमुळेच क्रिस्टिनचे प्राण वाचल्याचं त्यांचे मित्र सांगतात.

Web Title: Pran's life has been read by a man in a terrorist attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.