‘सिंगल’साठी विवाहपूर्व टूर

By admin | Published: February 22, 2017 12:52 AM2017-02-22T00:52:17+5:302017-02-22T00:52:17+5:30

नवविवाहित जोडप्यांची पसंत म्हणून शिमला आणि कुलुमनाली या पर्यटनस्थळांकडे पाहिलं जातं. पण, अहमदाबाद

Pre-Touring Tours for 'Singles' | ‘सिंगल’साठी विवाहपूर्व टूर

‘सिंगल’साठी विवाहपूर्व टूर

Next

अहमदाबाद : नवविवाहित जोडप्यांची पसंत म्हणून शिमला आणि कुलुमनाली या पर्यटनस्थळांकडे पाहिलं जातं. पण, अहमदाबाद येथील ‘विना मूल्य अमूल्य सेवा’ या संघटनेने एक नवी योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार, मध्यम वयातील एकाकी व्यक्तींसाठी शिमला येथे विवाहपूर्व टूर आयोजित केली आहे. त्यातून आपल्याला अनुरुप असा जोडीदार निवडण्याची संधी त्यांना मिळणार आहे. ही टूर दहा दिवसांची असणार आहे. एकमेकांना समजून घेण्यासाठी हा वेळ देण्यात आला आहे.
आतापर्यंत ३५ जणांनी येथे नोंदणी केली आहे. याची फी आहे दहा हजार रुपये. यात प्रवास आणि हॉटेलमधील निवास व भोजन यांचा समावेश आहे. महिलांसाठी प्रवासाचे भाडे आकारण्यात येणार नाही. यातील दोन जण एनआरआय आहेत. एका ८५ वर्षांच्या व्यक्तीने आणि ७२ वर्षांच्या महिलेनेही नोंदणी केली आहे. हैदराबाद आणि बंगळुरुतूनही याचे आयोजन करण्यात आले आहे. यात विधवा आणि विधूर यांचा समावेश आहे. मध्यम वयातील हे स्त्री व पुरुष एकाकी जीवन जगत आहेत.

35 जणांनी  केली नोंदणी
10 दिवसांची असणार टूर
10000 रुपये फी

Web Title: Pre-Touring Tours for 'Singles'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.