असं कसं झालं बाई; पोरगी अचानकच झाली आई!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 03:24 PM2019-02-20T15:24:11+5:302019-02-20T15:28:26+5:30
चीनच्या गुइयांग शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीला पोटात वेदना होत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
(Photo Credit : AmarUjala)
चीनच्या गुइयांग शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीला पोटात वेदना होत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर या तरूणीने डॉक्टरांना जे काही सांगितलं त्याने डॉक्टरही चक्रावून गेले. ही तरूणी रूग्णालयात दाखल झाल्यावर तिलाही तेव्हाच अचानक कळालं की, ती गर्भवती आहे. पण गर्भवती महिलेने दावा केला की, तिचा कुणीही बॉयफ्रेन्ड नाहीये. मी अजून पूर्णपणे व्हर्जिन आहे. आश्चर्याची बाब म्हणजे व्हर्जिन असल्याचा दावा करणाऱ्या तरूणीने एका बाळालाही जन्म दिला. हे डॉक्टरांनाही बुचकळ्यात टाकणारं आहे.
मिररने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी जेव्हा तपासणी सुरू केली तेव्हा तरूणीने डॉक्टरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. तरूणीची म्हणणं आहे की, तिने कधीच कुणाशीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. तिचा बॉयफ्रेन्ड सुद्धा नाही.
डॉक्टरांनी तिला विचारले की, कधी नशेच्या स्थिती तिने कुणाशी शारीरिक संबंध ठेवले का? यावर ती म्हणाली की, मद्यसेवनाची तिला अॅलर्जी आहे. ती दारूला हातही लावत नाही. ही तरूणी शिकलेली असतानाही असं बोलत असल्याने डॉक्टरांना या प्रकरणाचं अधिकच आश्चर्य वाटलं.
डॉक्टरांनी सांगितलं की, एखाद्या तरूणीला थेट डिलिवरीच्या वेळी ती गर्भवती असल्याचं कळणे अशा घटना याआधीही घडल्या आहेत. या तरूणीचं वजन जास्त होतं आणि तिची मासिक पाळीही असामान्य राहत होती. त्यामुळे तिला कळालेच नाही की, ती गर्भवती आहे.
काही वेळा रूग्णाच्या आग्रहावरून फार कमी केसेसमध्ये सी-सेक्शन करण्याआधी व्हर्जिनिटी टेस्ट केली जाते. या तरूणीनेही डॉक्टरांवर व्हर्जिनिटी टेस्ट करण्यासाठी दबाव टाकला. कारण तिच्या म्हणण्यानुसार तिने कधीच कुणाशी शारीरिक संबंध ठेवले नव्हते. पण डॉक्टरांना तिला समजावून सांगण्यास फार वेळ लागला.
शेवटी डॉक्टरांनी तरूणीवर एक इमरजन्सी सी-सेक्शन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा या तरूणीने एका मुलाला जन्म दिला. मात्र तरूणीने या नवजात बाळाचा स्विकार करण्यास नकार दिला. असे सांगितले जात आहे की, रूग्णालयाने तरूणीच्या आई-वडिलांकडे या बाळाला सोपवले. पण अजून या बाळाला दत्तक दिलं जावं की, नाही याबाबत काहीही निर्णय घेतला नाहीये. रिपोर्ट्सनुसार, महिला एकटी राहते. तिने तिच्या वजनामुळे व अनियमित मासिक पाळीमुळे ती गर्भवती असल्याकडे लक्षच दिलं नाही.