डायनासॉर युगाच्या आधीपासून पृथ्वीवर असलेला जीव सापडला, बघा तीन डोळ्यांच्या जीवाचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 03:58 PM2022-12-30T15:58:31+5:302022-12-30T16:16:15+5:30
America : 29 वर्षीय अदार लीबोविच या डोंगरांमध्ये फिरत होता. तेव्हाच त्याची नजर एक अजब जीवावर पडली. तिथे त्याला तीन डोळे असलेला एक जीव दिसला. अदार एक कॉम्प्युटर इंजिनिअर आहे.
America : एका टुरिस्ट स्पॉटवर फिरायला गेलेल्या काही लोकांनी पृथ्वीवर 55 कोटी वर्षांपासून अस्तित्वात असलेले जीव सापडले आहेत. हे लोक अमेरिकेच्या अॅरिझोनामधील प्रसिद्ध डोंगर 'द वेव' बघण्यासाठी गेले होते. त्यांना तिथे बरेच ऐतिहासिक ट्रायओप्स दिसले. हे जीव डायनासोरच्या युगातील आहेत. याचा एक व्हिडीओ समोर आलाय ज्यात हे जीव पाण्यात पोहताना दिसत आहेत.
29 वर्षीय अदार लीबोविच या डोंगरांमध्ये फिरत होता. तेव्हाच त्याची नजर एक अजब जीवावर पडली. तिथे त्याला तीन डोळे असलेला एक जीव दिसला. अदार एक कॉम्प्युटर इंजिनिअर आहे.
अदार या जीवांचा व्हिडीओ इन्स्टावर टाकला. त्याने लिहिलं की, मी फार कन्फ्यूज होतो. मी एका वाळवंटात होतो आणि तिथे असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात मला जिवंत जीव आढळून आला.
या जीवांना ग्रीकमध्ये तीन डोळ्यांसाठी वापरला जाणारा शब्द ट्रायओप्स हे नाव देण्यात आलं आहे. या जीवाला दोन मोठे आणि एक छोटा डोळा असतो. छोटा डोळा दोन्ही मोठ्या डोळ्यांच्या मधे असतो. छोट्या डोळ्यात फोटोरिसेप्टर्स असतात जे लाइट डिटेक्ट करण्यासाठी मदत करतात.
36 कोटी वर्षापासून 43 वर्षादरम्यान डेवोनियन पीरीअडपासून आतापर्यंत ट्रायओप्सच्या बाहेरील दिसण्यात फार कमी बदल झाला आहे. 10 कोटी वर्षाआधी डायनासोर अस्तित्वात येण्याआधीही ट्रायओप्स पृथ्वीवर होते.
ट्रायओप्सचा व्हिडीओ शेअर करत अदारने सांगितलं की, आपण फार नशीबवान आहोत की, आपण या जगाचा भाग आहोत. जिथे ट्रायओप्स फिशसारखे जीव आहेत. जे पृथ्वीवर खूप आधीपासून आहेत.