देव तारी त्याला कोण मारी! डॉक्टरांनी नवजात बाळाला केलं मृत घोषित पण नंतर 'असा' झाला चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 12:35 PM2022-01-03T12:35:52+5:302022-01-03T12:41:19+5:30

डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं नवजात बाळ अचानक जिवंत झालं आहे.

premature baby found alive during funeral after declared dead by doctor brazil | देव तारी त्याला कोण मारी! डॉक्टरांनी नवजात बाळाला केलं मृत घोषित पण नंतर 'असा' झाला चमत्कार

देव तारी त्याला कोण मारी! डॉक्टरांनी नवजात बाळाला केलं मृत घोषित पण नंतर 'असा' झाला चमत्कार

Next

जगात चमत्कार नावाची काही गोष्ट नसते असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. लोक याला अंधश्रद्धा समजतात, तर काही लोक त्याला योगायोग असं देखील नाव देतात. मात्र ब्राझीलमध्ये अशीच एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे, जे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. हैराण करणारी घटना घडली आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं नवजात बाळ अचानक जिवंत झालं आहे. ब्राझीलच्या रॉनडोनियामध्ये 27 डिसेंबरला अशी घटना घडली, जी पाहून सगळेच थक्क झाले. 

मिरर वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, एका महिलेने घरीच एका प्रीमॅच्योर बाळाला जन्म दिला. बाळाचा जन्मताच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. पण देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण येथे आता चक्क खरी ठरली आहे. रिपोर्टनुसार, या घटनेतील महिलेला माहितीही नव्हतं की ती गरोदर आहे. पोटात दुखत असल्याने दोन वेळा ती रुग्णालयात गेली. मात्र डॉक्टरांनी तिला हे सांगून घरी पाठवलं की ती गरोदर नाही. 

बाळ प्रेग्नंसीच्या पाचव्या महिन्यातच जन्मलं

दुसऱ्यांदा घरी जाताच तिच्या वेदना आणखी तीव्र झाल्या आणि घरातच तिने बाळाला जन्म दिला. हे बाळ प्रेग्नंसीच्या पाचव्या महिन्यातच जन्मलं आणि जन्माच्या वेळी त्याचं वजन फक्त एक किलो होतं. मात्र जेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हे बाळं जन्मतानाच मृत होतं. रुग्णालयातच फ्यूनरल डायरेक्टरला बोलावलं गेलं आणि बाळाला दफन करण्याची जबाबदारी त्याच्याकडेच देण्यात आली. 

नवजात बाळाला दफन करणार तेवढ्यात अचानक झालं असं काही...

पहाटे तीनच्या सुमारास तो या बाळाला दफन करण्यासाठी घेऊन गेला. काहीच तासात सर्व कामं पूर्ण होताच त्याने बाळाला उचलून घेतलं. यावेळी बाळाच्या हृदयाचे ठोके अचानक सुरू असल्याचं त्याला जाणवलं. लगेचच हा व्यक्ती बाळाला रुग्णालयात घेऊन गेला आणि आयसीयूमध्ये दाखल केलं. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि फ्यूनरल होमने रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: premature baby found alive during funeral after declared dead by doctor brazil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.