हायवेच्या उद्घाटनासाठी आले राष्ट्राध्यक्ष, पण चिमुकल्याने साधली संधी आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 03:11 PM2021-09-08T15:11:52+5:302021-09-08T15:12:31+5:30
Turkey News: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अंकारा: कधी-कधी लहान मुलं असा काही खोडसाळपणा करतात, ज्यामुळे तुम्हाला राग येण्याऐवजी हसू येतं. अशीच एक घटना तुर्कीमध्ये घडली. तुर्कीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही पोटभरुन हसाल.
व्हिडिओ एका उद्घाटन सोहळ्याचा आहे. तुर्कीतील एका महामार्गावरील बोगद्याचे उद्घाटन तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोन यांच्या हस्ते होणार होते. एर्दोन पट्टी कट करुन बोगद्याचे उद्घाटन करणार होते. पण, त्यांनी पट्टी कापण्याआधीच एका चिमुकल्याने ती पट्टी कट केली. त्या चिमुकल्याने ती पट्टी मुद्दामून कापली नाही, तर चुकून त्याच्या हातून ती पट्टी कापली गेली.
A boy cut a ribbon during the opening ceremony for a highway tunnel in Turkey. That wasn’t such a big deal in itself, but that job had been reserved for Turkey’s president Tayyip Erdogan pic.twitter.com/dk0cNj3Yrp
— Reuters (@Reuters) September 5, 2021
पट्टी कापल्यानंतर मुलगा घाईत ती कापलेली पट्टी पकडून थांबतो. यानंतर, राष्ट्राध्यक्ष एर्दोन यांच्या ही बाब लक्षात येते. पण, ते त्या चिमुकल्याला न रागवता त्याच्याकडे पाहून हसतात. ही घटना 4 सप्टेंबरला झाल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.