Knowledge : किती असते एका विमानाची किंमत? आकडा पाहून येईल चक्कर....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 09:10 AM2023-05-15T09:10:59+5:302023-05-15T09:11:51+5:30
How Much Cost Of Aeroplane: विमान इतके महाग असण्यामागे त्यात लागणारी अत्याधुनिक टेक्निक, मशीन्स आणि मानवी श्रम आहे. ही टेक्निक जगातल्या अमेरिकेसारख्या काही मोजक्याच देशांमध्ये आहे.
How Much Cost Of Aeroplane: आजकाल प्रवास करणं आधीपेक्षा खूप सोपं झालं आहे. त्यासाठी लोक वेगवेगळ्या साधनांचा वापर करतात. तसेच दुसऱ्या शहरात किंवा देशात जाण्याचा विमानाचा वापर करतात. अनेक मोठ्या उद्योगपतींकडे तर त्यांची खाजगी विमानही असतात. अशात तुम्हाला बाइक, कार, बस यांच्या किंमती माहीत असतील, पण कधी विचार केलाय का की, एका विमानाची किंमत किती राहत असेल? या प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त लोकांकडे नसेल. त्यामुळे याचं उत्तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की, विमानांची काही फिक्स किंमत नसते. ही विमानं ऑर्डरनुसार तयार केले जातात. त्यांचा आकार, त्यात लावली जाणारी उपकरणं आणि सुविधां यांवर त्यांची किंमत अवलंबून असते. जर तुम्ही लहान आकाराचं 6 लोक बसू शकतील असं विमान घेतलं तर किंमत कमी असेल आणि मोठ्या आकाराचं घेतलं किंमत अनेक पटीने जास्त असेल.
कोट्यावधी ते अब्जो रूपयांचे असतात विमान
फायनांसिस वेबसाइटनुसार, गल्फस्ट्रीम IV विमानाची किंमत 38 मिलियन डॉलर म्हणजे 3 अब्ज 12 कोटी 57 लाख रूपये इतकी आहे. तर B-2 स्पिरिट विमानाची किंमत 737 मिलियन डॉलर म्हणजे साधारण 60 अब्ज रूपयांच्या आसपास आहे. जर सगळ्यात महागड्या विमानाबाबत सांगायचं तर बोइंग कंपनीच्या विमानाची किंमत सगळ्यात जास्त असते.
इतकी किंमत असण्याची कारणं
विमान इतके महाग असण्यामागे त्यात लागणारी अत्याधुनिक टेक्निक, मशीन्स आणि मानवी श्रम आहे. ही टेक्निक जगातल्या अमेरिकेसारख्या काही मोजक्याच देशांमध्ये आहे. याच कारणान या टेक्निकवर या देशांचा एकाधिकार बनून आहे. ते वाट्टेल त्या किंमत विमानं विकतात. त्यामुळे यांची किंमत इतकी असते. आता भारतासारख्या काही देशांमध्येही विमान बनवण्याची टेक्निक विकसित केली जात आहे. पण त्यासाठी अजून वेळ लागेल.
भारताबाबत सांगायचं तर इथे वेगवेगळी विमाने वापरली जातात. इथे 6 सीट्स असलेली विमानेही दिसतील आणि विशाल ग्लोबमास्टरसारखं विमानही दिसेल. ज्याला भारतीय वायुसेना ऑपरेट करतं. अनेक उद्योगपती कलाकार लहान आकारांची विमाने वापरतात. ज्यात खाणं-पिणं, मनोरंजन आणि झोपण्यासाठी बेडचीही व्यवस्था असते.