'या' देशात लोक पैसे देऊन तुरुंगात राहतात, वायफाय आणि टेस्टी फूडची सुविधा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 01:46 PM2018-08-13T13:46:28+5:302018-08-13T13:48:31+5:30
तुरुंगाचं साधं नाव काढलं तरी सर्वसामान्यांना घाम फुटतो. भारतात तरुंगाना नरक समजलं जातं. पण असाही एक देश आहे जिथे लोक पैसे देऊन तरुंगात रहायला जातात.
तुरुंगाचं साधं नाव काढलं तरी सर्वसामान्यांना घाम फुटतो. भारतात तरुंगाना नरक समजलं जातं. पण असाही एक देश आहे जिथे लोक पैसे देऊन तरुंगात रहायला जातात. पण या तरुंगात लोकांसाठी राहणं शिक्षा नाही तर मजा आहे. तुम्हालाही हे खरं वाटलं ना? पण हा तरुंग म्हणजे तरुंगासारखं एक हॉटेल आहे. तरुंग या हॉटेलची थीम आहे.
कुठे आहे हे हॉटेल?
मार्गेटच्या केंट सिटीमध्ये तयार करण्यात आलेलं हे हॉटेल पाहिल्यावर पूर्णपणे तरुंगासारखं आहे. मार्गेटमध्ये द बूथ पेनी रोप नावाने ओळखलं जाणारं हे हॉटेल आपल्या ग्राहकांना एक रात्र तरुंगात राहण्याचा अनुभव देतात.
इतका येतो खर्च
या हॉटेलमध्ये राहण्यासाठी पर्यटकांना एका रात्रीचे ७५ पाऊंड मोजावे लागतात. या हॉटेलमध्ये बेडरुमपासून ते खुर्ची आणि बेडही तरुंगासारखे आहेत. इतकेच नाही तर या हॉटेलमध्ये जेवण वाढणारे लोकही जेलरसारखे कपडे परिधान केलेले असतात.
या सुविधाही मिळतात
मार्गेट हा खूप थंड परिसर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी इथे ब्लॅंकेट आणि हिटरही आहे. सोबतच गरम पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. इतकेच नाही तर तरुंगातील ग्राहकांना वायफाय सेवाही दिली जाते.
स्वादिष्ट जेवण
तसा तर या हॉटेलमध्ये राहून पर्यटकांना खऱ्या तुरुंगात राहण्याचा अनुभव येतो. या हॉटेलमध्ये एका बंद खोलीत टेबलवर जेवण दिलं जातं. कैदी आणि जेलरच्या ड्रेसमध्ये वेटर्स जेवण वाढतात. महत्वाची गोष्ट म्हणजे या तुरुंगातील जेवण फार टेस्टी असतं.