उत्तरप्रदेशातील शहाजहानपूरमध्ये एका शेतकऱ्याने चक्क साप पकडून देण्यावर बक्षीस लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:52 AM2017-08-10T00:52:05+5:302017-08-21T16:45:33+5:30
उत्तरप्रदेशातील शहाजहानपूरमध्ये एका शेतकऱ्याने चक्क सापावर बक्षीस लावले आहे... तब्बल पाच हजार रुपयांचे. एका सापाने गेल्या दोन वर्षांत आपल्या मुलाला चार वेळा दंश केल्याची त्याची तक्रार आहे.
उत्तरप्रदेशातील शहाजहानपूरमध्ये एका शेतकऱ्याने चक्क सापावर बक्षीस लावले आहे... तब्बल पाच हजार रुपयांचे. एका सापाने गेल्या दोन वर्षांत आपल्या मुलाला चार वेळा दंश केल्याची त्याची तक्रार आहे. जो कोणी सापाला पकडून आणेल, त्याला पाच हजार रुपये दिले जातील, असे त्याने जाहीर केले आहे.
सापामुळे घाबरलेल्या सुरेंद्र कुमार या शेतकऱ्याने मुलाच्या संरक्षणासाठी घराबाहेर दोन सुरक्षारक्षक उभे केले आहेत. केवळ सुरेंद्र कुमारच नव्हे, तर गावकरीही सांगत आहेत की, सूड घेण्यासाठीच एक साप त्या मुलाला वारंवार दंश करीत आहे. शेतकºयाच्या मुलाने एका सापाला आॅक्टोबर २0१५मध्ये मारले होते.
त्यानंतर एका वर्षाने साप त्या मुलाला चावला. आपल्या मुलाने ज्या सापाला मारेल, त्याचा साथीदारच पुन्हा पुन्हा चावत आहे, असे सुरेंद्र कुमार याचे म्हणणे आहे. त्या सापाने मे, जुलै व आॅगस्टमध्येही मुलाला दंश केला होता. गेल्या दोन वर्षांत मुलाला चारदा सर्पदंश झाल्याने गावात ही अंधश्रद्धा पसरली आहे.