बूट पॉलिश करणाऱ्याचे उत्पन्न महिना १८ लाख
By admin | Published: March 31, 2017 01:04 AM2017-03-31T01:04:12+5:302017-03-31T01:04:12+5:30
वाचून कदाचित अतिशयोक्ती वाटेल; पण हे वास्तव आहे. अमेरिकेतील मॅनहट्टन येथील बूटपॉलिश
न्यूयॉर्क : वाचून कदाचित अतिशयोक्ती वाटेल; पण हे वास्तव आहे. अमेरिकेतील मॅनहट्टन येथील बूटपॉलिश करणाऱ्या एका व्यक्तीचे उत्पन्न आहे महिना १८ लाख रुपये. आता ते कसे? तर, बूटपॉलिश करणारे डॉन वार्ड म्हणतात, मासे पकडण्यासाठी माशांना खाद्य टाकावेच लागते ना. मीसुद्धा तेच करतो. येथील मुख्य मार्गावरील एका खुल्या दुकानासमोरच ते बसलेले असतात. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ते बूटपॉलिश करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यानंतर लोक बूटपॉलिश करण्यासाठी येथे थोडा वेळ थांबतात. बूटपॉलिश करताना सुरू होते डॉन वार्ड यांची करमणूक़ या लोकांना ते विनोदी किस्से सांगून खूप हसवितात. अशा प्रकारे लोक त्यांच्याकडे बूटपॉलिश करण्यासाठी मोठ्या संख्येने येत राहतात. एका दिवसाची त्यांची कमाई आहे ९०० डॉलर म्हणजे भारतीय चलनात ६० हजार रुपये. आपले काम आणि उत्पन्न यामुळे आपण समाधानी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.