ऐकावं ते नवलच! महिन्याला तब्बल 8 लाख कमवतो 'हा' भिकारी; सत्य समजताच बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 02:13 PM2024-03-06T14:13:04+5:302024-03-06T14:23:13+5:30
एका महिन्यात तब्बल 8 लाख रुपये कमावतो, तेही केवळ भीक मागून.
जगभरातील लोक पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. अनेक वेळा गोष्टी इतक्या विचित्र असतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. अलीकडेच चीनमधील एक 'भिकारी' यामुळे चर्चेत आला आहे. हा व्यक्ती एका महिन्यात 70,000 युआन म्हणजेच तब्बल 8 लाख रुपये कमावतो, तेही केवळ भीक मागून. धक्कादायक बाब म्हणजे ही व्यक्ती प्रत्यक्षात भिकारी नसून तो एक प्रोफेशनल एक्टर आहे.
गेल्या 12 वर्षांपासून एक्टर लू जिंगांग एका लोकप्रिय पर्यटन स्थळावर भिकाऱ्यासारखे वागत आहे. जेणेकरून लोकांना त्याची कीव येते. तसेच लोकांनी दिलेल्या पैशातून तो आपलं जीवन जगत आहे. लू जिंगाँगकडे बघून, तुम्हाला वाटेल की तो एक गरीब भिकारी आहे जो कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले जीवन जगतो आहे. पण सत्य वेगळच आहे. तो खरोखर खूप हुशार आहे.
आपला घाणेरडा चेहरा, उदास डोळे आणि फाटलेल्या कपड्यांसह तो पर्यटकांना आपण भिकारी असल्याचं अगदी बरोबर भासवतो. अभिनेता दरमहा 70,000 युआन म्हणजे 8 लाखांपर्यंत कमावतो आणि लोक त्याला चांगले अन्न देखील देतात.
टाइम डॉक्टरच्या मते, चीनमध्ये सध्या सरासरी मासिक पगार सुमारे 29,000 युआन (3.33 लाख रुपये) आहे, ज्यामुळे लू जिंगांग आशियाई देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींपैकी एक बनला आहे. काही लोक त्याला चीनचा सर्वात श्रीमंत भिकारी म्हणू लागले आहेत.
लू म्हणतो की, त्याने करिअरचा हा असामान्य मार्ग निवडला कारण त्याला फक्त अभिनयाची आवड होती आणि त्यामुळे त्याला ऑडिशन न देता असे करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला कुटुंबीयांनी त्याला साथ दिली नाही, पण उत्पन्न पाहून कुटुंबही आता साथ देत आहे.