ही आहे अशी जलपरी जिच्या शेपटीची किंमत ऐकुन तुम्हाला बसेल धक्का, म्हणाल यापेक्षा सोनं स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 02:49 PM2021-11-19T14:49:50+5:302021-11-19T14:50:01+5:30
एक महिला लहानपणापासूनच जलपरीच्या गोष्टी ऐकत होती. यामुळे ती जलपरीकडे इतकी आकर्षित झाली की आता ती प्रोफेशनल जलपरी (Professional Mermaid) बनली आहे. प्रोफेशनल मरमेड फेलिसियाचे (Real Life Mermaid) फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.
लहानपणी तुम्हीही जलपरीच्या अनेक गोष्टी (Mermaid Stories) ऐकल्या असतील. जलपरी म्हणजेच असा मासा जो अर्धा मनुष्य आणि अर्धा मासा असतो. हा मासा केवळ गोष्टींमध्येच पाहायला किंवा ऐकायला मिळाला. मात्र प्रत्यक्षात अशी जलपरी खरंच असते का हे सिद्ध झालं नाही. एक महिला लहानपणापासूनच जलपरीच्या गोष्टी ऐकत होती. यामुळे ती जलपरीकडे इतकी आकर्षित झाली की आता ती प्रोफेशनल जलपरी (Professional Mermaid) बनली आहे. प्रोफेशनल मरमेड फेलिसियाचे (Real Life Mermaid) फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.
फेलिसियाने आजपासून आठ वर्षांपूर्वी प्रोफेशनल मरमेडा जॉब सुरू केला. आपल्या कामात एक्सपर्ट बनण्यासाठी तिनं स्कूबा ड्रायव्हिंगचं प्रमाणपत्र घेतलं. यानंतर तिनं आपल्यासाठी माशाची पहिली शेपटी विकत घेतली. आता ती या शेपटीसोबत अमेरिकेच्या अनेक भागांत परफॉर्मन्स करते. आपल्या या परफॉर्मन्ससाठी ती भरपूर मेहनत घेते. डेली स्टारला दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलं की जेव्हा तिला या प्रोफेशनबद्दल समजलं तेव्हा तिने ठरवलं की ती यात एक्सपर्ट बनणार. याच कारणामुळे तिने स्कूबा ड्रायव्हिंग शिकलं आणि यानंतर आपल्यासाठी परफेक्ट शेपटीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
फेलिसियानं सांगितलं, की जलपरीची ट्रेनिंग अतिशय अवघड होती. पाण्यात ती मजा घ्यायची मात्र यासाठी तिला अनेक ट्रिक्स शिकाव्या लागल्या. तिला पाण्यात श्वास रोखण्याची ट्रेनिंगही घ्यावी लागली. फेलिसिया आपलं काम भरपूर एन्जॉय करते. मात्र आपल्या महागड्या शेपटीमुळे ती चिंतेत आहे. कारण या सिलिकॉनच्या शेपटीची किंमत तब्बल दोन लाख आहे. तिच्याकडे इतक्या महागडच्या अनेक शेपटी आहेत.
पाहताना अतिशय सोपं वाटत असलं तरी तिचं हे काम अतिशय अवघड आहे. तिला टँकमध्ये सलग एक तासाची शिफ्ट करावी लागते. एका तासानंतर तिला ब्रेक मिळतो. यातच ती फ्रेश होते. अशात शेपटी वारंवार काढावी लागते. सोबतच इतका वेळ सतत पाण्यात राहण्यानं सर्दी होण्याची तसंच आजारी पडण्याची शक्यताही अधिक वाढते. मात्र, फेलिसिया आता आपल्या कामात एक्सपर्ट झाली