एकाच व्यक्तीने काढला तलावातील गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2017 01:57 AM2017-04-19T01:57:56+5:302017-04-19T01:57:56+5:30
सार्वजनिक काम करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही. सरकारची जबाबदारी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
कोलकाता : सार्वजनिक काम करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही. सरकारची जबाबदारी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण, कोलकात्यातील परिमर धर ही व्यक्ती याला अपवाद आहेत. जादवपूरच्या विद्यासागर कॉलनीत राहणाऱ्या धर यांनी या परिसरातील एक मोठा तलाव स्वच्छ करण्याचे ठरविले. कारण, येथे खूप कचरा आणि गाळ साचला होता. त्यासाठी कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता त्यांनी स्वत: च या कामी पुढाकार घेतला. हा तलाव खूप वर्षांपासूनचा आहे आणि केवळ दुर्लक्षामुळे यात कचरा, गाळ साचला होता. त्यामुळे प्रदूषणही वाढले होते. स्थानिक नगरसेवकाच्या मदतीने त्यांनी या तलावातून ५० डंपर गाळ काढला. आता हा परिसर स्वच्छ झाला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी स्वच्छ पाणीसाठा होऊ शकणार आहे. या ठिकाणी त्यांनी फुटपाथ बनविला असून परिसरात दिवेही लावले आहेत. या भागात आता सायंकाळच्या वेळी लोक फिरायला येऊ लागले आहेत. पर्यावरण संरक्षणात आपले हे छोटे योगदान असल्याचे धर यांचे म्हणणे आहे.