बाबो! यूटयूबवर व्हिडीओ पाहून पुण्यातील बहीण-भावाने छापल्या नकली नोटा आणि.....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 01:24 PM2020-09-18T13:24:56+5:302020-09-18T13:28:06+5:30

पुण्यातील एका भाऊ-बहिणीने पैशासाठी असाच चुकीचा मार्ग निवडला. येथील भाऊ-बहिणी यूट्यूबवर नकली नोटा बनवण्याचं शिकले. या नोटा त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला, पण पकडले गेले.

Pune siblings attempt duo used to print fake currency notes took training from youtube | बाबो! यूटयूबवर व्हिडीओ पाहून पुण्यातील बहीण-भावाने छापल्या नकली नोटा आणि.....

बाबो! यूटयूबवर व्हिडीओ पाहून पुण्यातील बहीण-भावाने छापल्या नकली नोटा आणि.....

Next

यूट्यूबवर ज्ञानाच भांडार आहे. या प्लॅटफॉर्मवरून अनेकजण खूप चांगलं शिकतात. डान्स असो वा जेवण तयार करणं किंवा अभ्यास यावर सगळंच शिकता येतं. पण काही लोक यूट्यूवरून चुकीच्या गोष्टीही शिकतात. यावर तुम्हाला पैसा कमावण्याच्या अनेक पद्धतीही सापडतात. पुण्यातील एका भाऊ-बहिणीने पैशासाठी असाच चुकीचा मार्ग निवडला. येथील भाऊ-बहिणी यूट्यूबवर नकली नोटा बनवण्याचं शिकले. या नोटा त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केला, पण पकडले गेले. सांगण्यात आलंय की, त्यांनी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून 100 रूपयांच्या ३४ मोटा छापल्या होत्या.

आरोपींचं नावे सुनीता राय(२२) आणि प्रदीप राय(१८) अशी आहेत. पुणे मिररच्या रिपोर्टनुसार, दोघे बहीण-भाऊ भोसरीच्या भांडी मंडईत गेले होते. जिथे त्यांनी एका दुकानदाराला काही खऱ्या नोटांसह नकली नोटा दिल्या. त्या नोटांची क्वालिटी पाहून  दुकानदाराला शंका आली. त्याने जेव्हा सुनीताला याबाबत विचारले तर सुनीता तेथून जाऊ लागली. आजूबाजूच्या लोकांनी तिच्या भावाला पकडलं आणि पोलिसांना याची माहिती दिली.

पिंपरी चिंचवड क्राइम ब्रांचचे अधिकारी उत्तम तांगडे यांनी प्रकरणाचा तपास केला. त्यांनी सुनीतालाही अटक केली. दोघांनीही गुन्हा कबूल केला असून त्यांच्या घरातून ३४, २१० रूपयांचं साहित्य ताब्यात घेतलं. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

तांगडे यांनी सांगितले की, सुनीताचं लग्न झालेलं आणि ती पतीसोबत राहते. पण तरी सुद्धा ती भावासोबत मिळून यूट्यूबवर व्हिडीओ पाहून नकली नोटा बनवायची टेक्निक शिकत होती. पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहे. कारण त्यांना संशय आहे की, यात त्यांत्यासोबत आणखी लोक असू शकतात.

मला कोरोना झालाय म्हणत पती घर सोडून गेला; पोलिसांना इंदूरमध्ये गर्लफ्रेंडसोबत सापडला

बनावट धनादेशाद्वारे धान्य खरेदी करुन मुंबईच्या व्यापाऱ्याची एक लाख २१ हजारांची फसवणूक

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

Web Title: Pune siblings attempt duo used to print fake currency notes took training from youtube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.