मानलं गड्या! लॉकडाऊनमध्ये पठ्ठ्यानं बनवली भन्नाट सायकल; अन् हजारो रुपयांना होतेय विक्री

By manali.bagul | Published: September 20, 2020 02:37 PM2020-09-20T14:37:25+5:302020-09-20T14:45:38+5:30

लॉकडाऊनमध्ये जेव्हा काम, उद्योग, व्यवसाय पूर्णपणे ठप्प होते तेव्हा आपल्या कलात्मकतेचा वापर करून लाकडाची सायकल बनवली आहे.  

Punjab carpenter make a wooden bicycle in during corona pandemic | मानलं गड्या! लॉकडाऊनमध्ये पठ्ठ्यानं बनवली भन्नाट सायकल; अन् हजारो रुपयांना होतेय विक्री

मानलं गड्या! लॉकडाऊनमध्ये पठ्ठ्यानं बनवली भन्नाट सायकल; अन् हजारो रुपयांना होतेय विक्री

Next

(image Credit- The logocal Indians)

कोरोना काळात समाजातील अनेक घटकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकजण बेरोजगार आहेत. तर काहींना  लॉकडाऊनमुळे नोकरी नसल्यानं नैराश्याचा सामना करावा लागला आहे. पण  पंजाबच्या रहिवासी असलेल्या एका माणसानं लॉकडाऊनच्या वेळेचा पुरेपूर फायदा घेत  एक अविष्कार केला आहे. घरी बसल्याबसल्या लाकडापासून एक सायकल  तयार केली आहे. सध्या या माणसानं तयार केलेली सायकल चर्चेचा विषय ठरली आहे. 

आपली स्वतःची सायकल किंवा बाईक असावी असं प्रत्येकालाच वाटंत असतं. तसंच मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी बाईक किंवा सायकल सगळ्यात पालकांना  घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला पंजाबचा रहिवासी असलेल्या एका  ४० वर्षीय  धनीराम सग्गु यांची कहाणी सांगणार आहोत. धनीराम यांनी लॉकडाऊनचा पुरेपुर फायदा घेत स्वतःच सायकल बनवली आहे. 'द बेटर इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनमध्ये जेव्हा काम, उद्योग, व्यवसाय पूर्णपणे ठप्प होते तेव्हा आपल्या कलात्मकतेचा वापर करून लाकडाची सायकल बनवली आहे.  

घरात पडलेले प्लायवुड आणि जुन्या सायकलच्या सामानाच्या मदतीनं ही सायकल तयार केली आहे. 
सायकलचं मॅकेनिझम आणि इंजिनिअरिंगला व्यवस्थित समजून घेऊन त्यांनी सगळ्यात आधी ब्लूप्रिंट डिजाईन तयार केली आणि  त्यावर काम करायला सुरूवात केली. यावेळी त्यांनी आपल्या जुन्या सायकलचं पॅडल, सीट आणि साईड स्टँडचा वापर केला.

पहिली डिजाईन तयार करण्यासाठी एक महिना लागला. त्यानंतरच्या टप्प्यात  धनीराम यांनी कॅनेडियन लाकडाचा वापर केला. हे लाकून स्वस्त, हलकं आणि तितकंच टिकाऊ  सुद्धा असतं. विशेष म्हणजे एक खाजगी कंपनी ही सायकल १५ हजार रुपयांना विकण्यास तयार झाली आहे. ही सायकल तुम्ही २५ ते ३० किमी अंतरापर्यंत जाऊ शकते. जालंधर, दिल्ली आणि दक्षिण आफ्रिकेत या सायकलची विक्री होत आहे. 

हे पण वाचा-

काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ

सभागृहात टॉपलेस तरूणीचा फोटो बघताना आढळला खासदार, म्हणे - 'तिला मदत करत होतो'

शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा

बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ

लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...

Web Title: Punjab carpenter make a wooden bicycle in during corona pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.