क्या बात! केवळ १०० रूपयात बदललं महिलेचं नशीब, रातोरात बनली कोट्याधीश...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 11:02 AM2021-02-26T11:02:10+5:302021-02-26T11:03:55+5:30
पंजाबच्या अमृतसर शहरात राहणारी रेणु चौहान एक हाउसवाइफ आहे. काही दिवसांआधी तिने एक १०० रूपयांची लॉटरीची तिकीट खरेदी केली होती.
रातोरात श्रीमंत होण्याचं स्वप्न अनेकजण बघतात. कधी भारी वाटेल आपण सकळी उठल्यावर आपल्याला अचानक कोट्याधीश झाल्याची बातमी समजेल. पंजाबच्या अमृतसरमध्ये राहणाऱ्या एका हाउसवाइफसोबत असंच काहीसं झालंय. ती रातोरात कोट्याधीश झाली.
पंजाबच्या अमृतसर शहरात राहणारी रेणु चौहान एक हाउसवाइफ आहे. काही दिवसांआधी तिने एक १०० रूपयांची लॉटरीची तिकीट खरेदी केली होती. रिझल्ट आल्यावर समजलं की, तिने १ कोटी रूपयांचं बक्षीस जिंकलं आहे. हाउसवाइफ असलेली रेणु चौहान अचानक इतके पैसे मिळाल्याने फारच आनंदी आहे. ती याला देवाचा आशीर्वाद मानत आहे. (हे पण वाचा : कमाल! मुंबईच्या रिक्षावाल्यानं नातीला शिकवण्यासाठी घर विकलं; अन् आता दान मिळाले तब्बल २४ लाख)
एएनआयच्या रिपोर्टनुसार, रेणु चौहान ही अमृतसरमध्ये लॉरेंस रोडवर राहते. तिचे पती कपड्याचं दुकान चालवता आणि ती एका मध्यमवर्गीय कुंटुंबातील आहे. रेणु सांगते की, लॉटरीतून मिळालेल्या पैशातून ती तिचं जगणं सोपं करू शकेल. हे लॉटरीचं तिकीट तिने केवळ १०० रूपयात खरेदी केलं होतं. (हे पण वाचा : नशीब चमकलं! खोदकाम करताना सापडले दोन किंमती हिरे, मजुरांची आर्थिक परिस्थिती बदलणार...)
पंजाब राज्य लॉटरी विभागाच्या प्रवक्त्यांनुसार दर महिन्याला निघत असलेल्या पंजाब स्टेट डीअर १०० प्लस लॉटरी ड्रॉ यावेळी ११ फेब्रुवारीला काढण्यात आला होता. यात पहिल बक्षीस तिकीट नंबर डी-12228 ला मिळालं. त्यांनी सांगितले की, रेणुने बक्षीसाची रक्कम मिळवण्यासाठी लॉटरी तिकीट आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. लवकरच जिंकलेली रक्कम तिच्या अकाउंटवर ट्रान्सवर केली जाईल.