एलिअन्सबाबत अजून एक अवाक् करणारा दावा, बर्फाखाली सापडलं असं काही की...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 10:57 AM2024-02-06T10:57:31+5:302024-02-06T10:58:08+5:30

ही घटना अंटार्कटिकामधील आहे. इथे एक पिरॅमिडसारखा दिसणारा डोंगर दिसला आहे. 

Pyramid like mountain discovered in Antarctica people linked it with aliens illuminati | एलिअन्सबाबत अजून एक अवाक् करणारा दावा, बर्फाखाली सापडलं असं काही की...

एलिअन्सबाबत अजून एक अवाक् करणारा दावा, बर्फाखाली सापडलं असं काही की...

एलिअन्स आणि त्यांच्या अस्तित्वाबाबत नेहमीच वेगवेगळे दावे केले जातात. अशात आणखी एक घटना सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. ही घटना अंटार्कटिकामधील आहे. इथे एक पिरॅमिडसारखा दिसणारा डोंगर दिसला आहे. 

याचा संबंध काही लोकांनी एलिअन्ससोबत जोडला आहे. तर काहींनी प्राचीन सभ्यतांसोबत जोडला. यावर एक्सपर्ट म्हणाले की, हा बर्फाचा पिरॅमिड पूर्णपणे नैसर्गिक आहे. हा पिरॅमिड एका सॅटेलाईटच्या माध्यमातून शोधण्यात आला होता.

सोशल मीडियावर या पिरॅमिडबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. काही लोक म्हणाले की, हा पिरॅमिड प्राचीन सभ्यता आणि सीक्रेट सोसायची इलुमिनातीसंबंधी आहे.

तर प्रोफेसर एरिक रिग्नॉट यांच्या नेतृत्वातील टिममध्ये असलेल्या लोकांनी हे दावे नाकारले होते. असं सांगण्यात आलं की, पिरॅमिडसारख्या दिसणाऱ्या डोंगरामागे ग्लेशिअर हे कारण असू शकतं. सोबतच हेही सांगण्यात आलं की, जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी बघण्यात आलेल्या अशा गोष्टी नैसर्गिक घटना आहेत. 
 

Web Title: Pyramid like mountain discovered in Antarctica people linked it with aliens illuminati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.