सुपरमार्केटमध्ये मसाल्यांच्या डब्यांमध्ये काय करत होता अजगर? पाहताच महिलेची उडाली भंबेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 11:30 AM2021-08-19T11:30:31+5:302021-08-19T13:23:38+5:30

ऑस्ट्रेलियातील एका महिलेला चक्क सुपरमार्केटमध्ये साप आढळलाय. तोही मसाल्यांच्या डब्यांमध्ये. तुम्ही स्वपनातही याची कल्पना करू शकत नाही पण या महिलेने हे प्रत्यक्ष अनुभवलंय.

python in supermarket in Australia Sydney. hidden in the spice shelf. woman catches it | सुपरमार्केटमध्ये मसाल्यांच्या डब्यांमध्ये काय करत होता अजगर? पाहताच महिलेची उडाली भंबेरी

सुपरमार्केटमध्ये मसाल्यांच्या डब्यांमध्ये काय करत होता अजगर? पाहताच महिलेची उडाली भंबेरी

Next

जंगलात किंवा एखाद्या रानात साप किंवा अजगराचे (Python) दर्शन होणे सहज आहे. पण ऑस्ट्रेलियातील एका महिलेला चक्क सुपरमार्केटमध्ये साप आढळलाय. तोही मसाल्यांच्या डब्यांमध्ये. तुम्ही स्वपनातही याची कल्पना करू शकत नाही पण या महिलेने हे प्रत्यक्ष अनुभवलंय. (Python in Supermarket) 

ऑस्ट्रेलियाच्या (Ausralia) सि़डनीतील (Sydney)  ही घटना आहे. वुलवर्थ्स सुपरमार्केटमध्ये  (Woolworths Supermarket) एक महिला सामान खरेदी करण्यासाठी गेली. ती मसाले घेत होती. तिथं मसाल्यांच्या डब्यामागे तिला दोन डोळे चमकताना दिसले. त्यानंतर पुढे जे दिसलं ते पाहून तिला धक्काच बसला. ते डोळे चक्क अजगराचे होते. भलामोठा अजगर सुपरमार्केटमध्ये डब्यांमागे लपून बसला होता (Hidden Python in spice stock). महिला घाबरली पण परिस्थितीचं भान राखत ती मोठ्याने ओरडली नाही.

हेलाइना अल्टी (Helaina Alati ) असं या महिलेचं नाव आहे.  तिने दिलेल्या माहितीनुसार, ती  मसाले घेत होती. तेव्हा तिला डब्यामागे डोळे दिसले. अजगर तिच्यापासून फक्त २० सेंटिमीटर दूर होता. हेलाइना स्वतः साप पकडण्यातील एक्सपर्ट होती. त्यामुळे तिने आधी सुपरमार्केटमधील कर्मचाऱ्यांना तिथं अजगर असल्याची माहिती दिली, त्यानंतर तिनं आपल्या घरी जाऊन काही आवश्यक सामान आणून अजगराला पकडण्यात मदत केली. 

अजगर शांत होता आणि तो सहजपणे बॅगेत गेला, असं तिनं सांगितलं. अनेक विचित्र ठिकाणी तिने सापांना पकडलं आहे, पण सुपरमार्केटमध्येही साप असू शकतो, याची आपण कल्पना केली नव्हती, असं हेलाइनाने सांगितलं. माहितीनुसार हा अजगर विषारी नव्हता पण तो चावल्यास प्रचंड वेदना झाल्या असत्या. इतर सापांप्रमाणे त्यांच्यात विष नसतं. पण त्यांचे दात खूप लागतात.

Web Title: python in supermarket in Australia Sydney. hidden in the spice shelf. woman catches it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.