जगातली सर्वात सुंदर राणी, तिच्या रहस्यमयी जीवनावर आजही केला जातोय रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:51 PM2023-02-02T14:51:43+5:302023-02-02T15:24:20+5:30

Queen Cleopatra : इजिप्तची राजकुमारी क्लियोपॅट्राला सुंदरतेची देवी म्हटलं जातं. क्लियोपॅट्रा केवळ तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जात नाही तर तिचं जीवनही फार रहस्यमय होतं.

Queen Cleopatra and her mysterious life | जगातली सर्वात सुंदर राणी, तिच्या रहस्यमयी जीवनावर आजही केला जातोय रिसर्च

जगातली सर्वात सुंदर राणी, तिच्या रहस्यमयी जीवनावर आजही केला जातोय रिसर्च

googlenewsNext

Queen Cleopatra : तुम्ही इतिहासातील अशा अनेक राजकुमारी आणि राण्यांबाबत काहीना काही वाचल असेल ज्या त्यांच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध होत्या. आणि इतिहासाच्या पानांवर त्यांचं सौंदर्य अमर आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका राजकुमारीबाबत सांगणार आहोत, जी जगभरात सर्वात सुंदर राजकुमारी म्हणूनच ओळखली जाते.

इजिप्तची राजकुमारी क्लियोपॅट्राला सुंदरतेची देवी म्हटलं जातं. क्लियोपॅट्रा केवळ तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जात नाही तर तिचं जीवनही फार रहस्यमय होतं. इतकं की आजही संशोधक तिच्या जीवनावर संशोधन करत असतात. क्लियोपॅट्रा जेवढी सुंदर होती, तेवढीच ती चतुर आणि षडयंत्र करणारी सुद्धा होती.

वडिलांच्या मृत्यूनंतर केवळ १४ व्या वर्षी क्लियोपॅट्रा आणि तिचा भाऊ टोलेमी दियोनिससला संयुक्त रूपाने राज्य मिळालं. पण भावाला बहिणीचा हस्तक्षेप सहन होत नव्हता आणि त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. क्लियोपॅट्राच्या हातून सत्ता गेली होती. त्यामुळे तिला सिरियामध्ये रहावं लागलं होतं. पण तिने हार मानली नव्हती.

रोमचा शासक ज्यूलिअस सीजरला तिने तिच्या मोहात अडकवून इजिप्तवर हल्ला केला आणि सीजरने टोलेमीला मारून क्लियोपॅट्राला इजिप्तच्या राजसिंहासनावर बसवलं.

क्लियोपॅट्राच्या मृत्यूबाबतही एक रहस्य आहे. रोमन राज्याआधी सम्राट ऑगस्टसने क्लियोपॅट्राला हरवल्यावर आपलं शासन स्थापन केलं होतं. एका रिसर्चनुसार, जेव्हा ऑगस्टसकडे वर्षातील एका महिन्याला त्याचं नाव देण्याची संधी होती. तेव्हा त्याने क्लियोपॅट्राच्या पराभवाचं अनुस्मारक तयार करण्यासाठी आठवा महिना निवडला. ज्यात क्लियोपॅट्राचा मृत्यू झाला होता.

ऑगस्टस क्लियोपॅट्राला रोममध्ये एक कैदी म्हणून ठेवणार होता. पण त्याला रोखण्यासाठी क्लियोपॅट्राने स्वत:ला संपवले होते. याने हे स्पष्ट होतं की, क्लियोपॅट्रा ही तिच्या प्रेमासाठी मरण पावली नव्हती. क्लियोपॅट्रा आज इतिहासातील एक अशी रहस्यमय व्यक्ती झाली आहे की, जिच्या रहस्यमय जीवनावरून पडदा उठवण्याचं काम अजूनही सुरू आहे.

Web Title: Queen Cleopatra and her mysterious life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.