अरे देवा! 1857 च्या उठावावर प्रकाश टाका असा प्रश्न विचारताच विद्यार्थ्याचं 'असं' भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 02:51 PM2023-01-03T14:51:26+5:302023-01-03T15:01:52+5:30
एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अभ्यास, परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते. पण कित्येकदा अभ्यास न झाल्याने परीक्षेत कॉपी केली जाते किंवा मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर काहीही लिहिलं जातं. काही विद्यार्थी उत्तर लिहिण्याऐवजी चित्रपटातील गाणी अथवा डायलॉग लिहितात. तर काही जण वाटेल ते लिहितात. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
विद्यार्थ्याने पेपरमध्ये लिहिलेलं उत्तर पाहून शिक्षकांनी थेट डोक्यालाच हात लावला आहे. सध्या याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका उत्तरपत्रिकेचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. शिक्षक कोमात आणि विद्यार्थी जोमात असंच म्हणावं लागेल. व्हायरल होत असलेल्या उत्तरपत्रिकेत एक प्रश्न विचारण्यात आला असून त्यात लिहिले आहे, 1857 च्या उठावावर प्रकाश टाका. याचा अर्थ तुम्हालाही कळला असेल.
1857 चा उठाव कसा आणि का झाला असा प्रश्न पेपरमध्ये विचारण्यात आला होता. पण या प्रश्नाला एका विद्यार्थ्याने असं उत्तर दिलं, ज्याचा तुम्ही कधीच विचार करू शकत नाही किंवा ते तुमच्या कल्पनेपलीकडचे असेल असे म्हणा. विद्यार्थ्याने प्रश्नाच्या उत्तरात काही लिहिण्याऐवजी उत्तरपत्रिकेवर उत्तराच्या जागी टॉर्च तयार करून त्यातून अनेक प्रकाशकिरणांचा वर्षाव केला. आणि खाली लिहिले... प्रकाश टाकला.
आता ही उत्तरपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे आणि ती पाहून लोकांना हसू आवरत नाही. हा फोटो फनी व्हिडिओ नावाच्या पेजवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टला आतापर्यंत सुमारे 90 हजार लाईक्स मिळाले आहेत. पोस्टवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"