हा तर बॉलीवुड फॅन! परिक्षेत विचारलं चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण? चिमुकल्याने उत्तर दिलं, बाहुबली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 04:16 PM2021-08-06T16:16:43+5:302021-08-06T16:21:04+5:30
परिक्षेच्या पेपरात काहीही सुचत नसल्यास बॉलीवुडची गाणी लिहुन येणारेही महाभाग काही कमी नसतात. एका चिमुकल्याने परिक्षेत एका प्रश्नाचं उत्तर म्हणून एका हिंदी सिनेमाचं नाव लिहिलं. आणि अहो आश्चर्यम! ते उत्तर बरोबरही आलं. शिक्षकाने त्या उत्तराचे त्याला गुणंही दिले..
तुम्ही शाळेत असताना परिक्षेत केव्हाना केव्हा नक्कीच चुकीचे उत्तर लिहिले असेल. त्याचे मार्क म्हणून तुम्हाला भोपळाही मिळाला असेल. परिक्षेच्या पेपरात काहीही सुचत नसल्यास बॉलीवुडची गाणी लिहुन येणारेही महाभाग काही कमी नसतात. एका चिमुकल्याने परिक्षेत एका प्रश्नाचं उत्तर म्हणून एका हिंदी सिनेमाचं नाव लिहिलं. आणि अहो आश्चर्यम! ते उत्तर बरोबरही आलं. उलट शिक्षकाने त्या उत्तराचे त्याला अधिक गुण दिले..
First man on #Moon ?
— Rupin Sharma IPS (@rupin1992) August 5, 2021
A #Bollywood fan's view☺️☺️☺️☺️☺️ pic.twitter.com/z7Hvl7XSd8
सध्या सोशल मिडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. फोटो जरी जुना असला तरी त्यामुळे उमटणार तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य अगदी ताजतवानं असेल. प्रश्न पत्रिकेत प्रश्न विचारला होता, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण होता? त्यावर ती प्रश्नपत्रिका सोडवणाऱ्या चिमुकल्याने उत्तर दिलंय बाहुबली!
बरं या प्रश्नाचं उत्तर बाहुबली दिलंय यावरच हा जोक संपत नाही बरं का! त्या लहानमुलाच्या बुद्धीचे तुम्ही कौतुकच कराल. त्या प्रश्नाच्या उत्तराची त्याने फोड केलीय ती अशी, बाहु (arm) बली (strong). त्यावर त्या शिक्षकाने त्याला ५ गुणांपैकी १० गुण दिले आहेत आणि बाजूला शेरा लिहिलाय लॉजिक साठी (for logic). त्या मुलानं प्रश्नाचं अर्ध उत्तर दिलंय. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारी व्यक्ती आहे, नील आर्मस्ट्राँग neil armstrong त्यातलं arm म्हणजे बाहु आणि strong म्हणजे बली. चक्रावलात ना? आता पोटभर हसा.