धूम्रपान सोडा आणि मिळवा २० ते ४० हजार रुपये; 'या' शहरानं आणली योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 11:29 PM2022-06-09T23:29:38+5:302022-06-09T23:30:47+5:30

ही योजना प्रभावी ठरली, तर ती देशाच्या इतर भागातही लागू होऊ शकते.

Quit smoking and get Rs 20,000 to Rs 40,000; The scheme brought by Cheshire East, UK | धूम्रपान सोडा आणि मिळवा २० ते ४० हजार रुपये; 'या' शहरानं आणली योजना

धूम्रपान सोडा आणि मिळवा २० ते ४० हजार रुपये; 'या' शहरानं आणली योजना

Next

धूम्रपानाचे व्यसन हे जीवनासाठी सर्वात मोठा धोका आहे, परंतु तरीही लोक हे व्यसन सोडू शकत नाहीत. तुम्ही ती म्हण ऐकली असेल - "बाप बडा ना भैया, सबसे बड़ा रुपया", त्यामुळे कदाचित या पैशाने लोकांची व्यसनातून सुटका होऊ शकेल. होय, कारण धूम्रपानाचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात पायलट कौन्सिल योजनेचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. ज्यामध्ये धूम्रपान सोडणाऱ्या व्यक्तीला सुमारे २० हजार रुपये रोख देण्याची तरतूद असेल. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना दुप्पट रक्कम दिली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे शहर ब्रिटनचे चेशायर ईस्ट आहे जिथे ही योजना आणली जात आहे. याचे कारण तिथले वाढते धूम्रपानाचे प्रमाण, जे कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे धूम्रपानाची आकडेवारी पाहता ब्रिटनच्या चेशायर ईस्टच्या या योजनेत गर्भवती महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेनुसार, धूम्रपान सोडणाऱ्यांना सुमारे २० हजार रुपये आणि धूम्रपान सोडणाऱ्या गर्भवती महिलांना सुमारे ४० हजार रुपये दिले जाणार आहेत.

टेस्ट करावी लागणार
ही योजना प्रभावी ठरली, तर ती देशाच्या इतर भागातही लागू होऊ शकते. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर एखाद्या व्यक्तीने धूम्रपान सोडल्याचा दावा केला असेल, तर त्याला चाचणीतून जावे लागेल. त्या व्यक्तीने खरोखर धूम्रपान सोडले आहे असा त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांना एक्सहेल्ड कार्बन मोनोऑक्साइड चाचणीला सामोरं जावं लागेल जेणेकरून त्या व्यक्तीने खरेच सिगारेट सोडली की नाही हे सिद्ध होईल.

टप्प्याटप्प्यात मिळणार रक्कम
एका रिपोर्टनुसार, जे लोक दिवसातून २० वेळा धूम्रपान करतात ते धूम्रपान करण्यासाठी वार्षिक ४.४ लाख रुपये खर्च करतात. याशिवाय फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या ७० टक्के प्रकरणे धूम्रपानाशी संबंधित आहेत. याशिवाय धूम्रपानामुळेही अनेक आजार होतात. या योजनेसाठी सुमारे १ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे, म्हणजेच या योजनेअंतर्गत लोकांना २० हजार आणि गर्भवती महिलांना ४० हजार रुपये टप्प्याटप्प्यात दिले जातील. जुलै महिन्यात ही योजना परिषदेसमोर मांडली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Quit smoking and get Rs 20,000 to Rs 40,000; The scheme brought by Cheshire East, UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.