VIDEO: कडक सॅल्यूट! 'या' भारतीयाने जगातल्या सर्वात मजबूत बॉडीबिल्डरला पंजा लढवण्यात दिली मात....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 11:01 AM2021-01-08T11:01:29+5:302021-01-08T11:10:36+5:30
नुकतीच राहुलने जगातला सर्वात मजबूत बॉडीबिल्डर लॅरी व्हील्ससोबत आर्म रेसलिंग मॅच खेळली. राहुल हा स्वत: भारताचा नॅशनल आर्म रेसलिंग चॅम्पियन आहे.
राहुल पॅनिकर हे नाव भलेही तुम्हाला आजपर्यंत माहीत नसेल, मात्र आता हे नाव तुमच्या लक्षातही राहील आणि तुम्ही त्याचे फॅनही व्हाल. कारण त्याने कामच तसं केलं आहे. कोच्चिला राहणाऱ्या राहुलने जगातल्या सर्वात मजबूत बॉडीबिल्डर Larry Wheels ला पंजा लढवण्याच्या स्पर्धेत दमदार मात दिली आहे. आर्म रेसलिंग करणाऱ्या राहुलचं कौतुकही होत आहे आणि त्याचा व्हिडीओही व्हायरल झालाय.
नुकतीच राहुलने जगातला सर्वात मजबूत बॉडीबिल्डर लॅरी व्हील्ससोबत आर्म रेसलिंग मॅच खेळली. राहुल हा स्वत: भारताचा नॅशनल आर्म रेसलिंग चॅम्पियन आहे. इंडियन आर्म रेसलिंग फेडरेशनने सांगितले की, लॅरीसोबतचा हा सामना सोपा नव्हता. राहुल आधी रोन राउंड हरला होता. पण पुढील राउंडमध्ये राहुलने दमदार मुकाबला केला. राहुलने हा कारनामा करत सर्वांना हैराण केलं आहे. ही मॅच दुबईमध्ये झाली होती.
राहुलने स्वत: या मॅचचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तुम्ही बघू शकता की, तो कशाप्रकारे हा आर्म रेसलिंगची मॅच जिंकतो. राहुलबाबत आणखी सांगायचं तर गेल्या १० वर्षात तो ६ पेक्षा जास्त राष्ट्रीय पदकं जिंकला आहे.
राहुलला रेसलिंगचे धडे घरातूनच मिळाले आहेत. त्याचे वडील पीटी पॅनिकर हे आयआरएस अधिकारी म्हणून रिटायर झाले. ते पॉवरलिफ्टरही होते. त्यांना 'पॉवर मॅन ऑफ इंडिया' हा किताबही मिळाला होता. त्याचे काका उन्नीक्रिष्नन पॅनिकर हे सुद्धा वेटलिफ्टींग चॅम्पियन होते. ते नंतर इंडियन टीमचे कोचही झाले होते. राहुलने १२व्या वर्गात असताना जिल्हास्तरिय खेळाडूसोबत पंजा लढवला होता. पण तेव्हा तो पराभूत झाला होता. आज तो चॅम्पियन आहे.