पाकिस्तानात रेल्वे भाडे वाढले, ३५० किमी अंतराचे तिकीट दर पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 03:26 PM2023-11-02T15:26:51+5:302023-11-02T15:27:30+5:30

पाकच्या रेल्वे प्रवासाच्या दरांनी लोकांचे कंबरडे मोडले आहे.

Railway fares increased in Pakistan, you will be surprised to see the ticket prices for 350 km distance | पाकिस्तानात रेल्वे भाडे वाढले, ३५० किमी अंतराचे तिकीट दर पाहून थक्क व्हाल

पाकिस्तानात रेल्वे भाडे वाढले, ३५० किमी अंतराचे तिकीट दर पाहून थक्क व्हाल

पाकिस्तानबाबत सध्या बऱ्याच बातम्या ऐकायला मिळतात, लोकांचे खाण्यापिण्याचे वांदे झालेत. देशात पीठासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागत आहेत. वीज संकट, पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर यामुळे पाकिस्तानात बिकट परिस्थिती निर्माण झालीय. परंतु त्याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे पाकमधील नागरिकांची चिंता वाढली आहे.

पाकिस्तानातील रेल्वे प्रवास, जो खूप महागला आहे. पाकच्या रेल्वे प्रवासाच्या दरांनी लोकांचे कंबरडे मोडले आहे. आज आम्ही तुम्हाला सांगतो, पाकिस्तानमध्ये रेल्वे प्रवासाचे तिकिट दर किती आहेत, जे ऐकून तुम्ही रेल्वेने प्रवास करणं सोडून सायकलनं प्रवास करणे पसंत कराल. पाकिस्तानात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढत आहे. रेल्वेच्या माध्यमातूनही लोकांचा खिसा रिकामा होत आहे. शेकडो नव्हे तर हजारो लोकांची बँक खाती खाली होतायेत. लाहोर हे पाकिस्तानच्या मोठ्या शहरांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने लोकांची ये-जा असते. पाकिस्तान इस्लामाबाद या शहराचे अंतर अंदाजे ३७८ किमी आहे. लाहोरपासून ३५० किमी अंतरावर असलेल्या रावळपिंडी शहरासाठी पाकिस्तान रेल्वे किती भाडे आकारतात ते पाहा.

३५० किमीसाठी किती भाडे आकारले जाते?

लाहोर ते रावळपिंडी या इस्लामाबाद एक्सप्रेस ट्रेनचे इकॉनॉमी क्लासचे भाडे ३९० रुपये आहे. त्याच वेळी, एसी लोअरचे भाडे ७२० रुपये आणि बिझनेस एसीचे भाडे ८४० रुपये आहे. मात्र, ट्रेन आणि सुविधांनुसार भाड्यात आणखी वाढ होऊ शकते. त्याच वेळी, भारतीय रेल्वेमध्ये, तुम्ही या भाड्यात दिल्लीपासून सुमारे ६०० किमी अंतरावर असलेल्या जम्मूला जाऊ शकता.

भारताच्या तुलनेत पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथे भाडे खूप जास्त आहे. भारतात प्रवासी वर्गाचे सरासरी भाडे २२.८ पैसे/किमी आहे, तर पाकिस्तानमध्ये ते सुमारे ४८ पैसे/किमी (११०% अधिक) आहे. नॉन-एसी आरक्षित श्रेणीमध्ये, भारतातील सरासरी प्रवासी भाडे सुमारे ३९.५ पैसे/किमी आहे, तर पाकिस्तानमध्ये तुम्हाला सुमारे ४८ पैसे/किमी (२२%) खर्च येईल. भारतीय रेल्वेचे प्रवासी भाडे या तिन्ही देशांपेक्षा खूपच कमी आहे.

ग्रीन लाइन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २ एसी पार्लर, ५ एसी बिझनेस, ६ एसी स्टँडर्ड आणि ४ ते ५ इकॉनॉमी क्लासचे डबे आहेत. पाकिस्तान रेल्वेने रावळपिंडी ते कराची या ग्रीन लाइन ट्रेनचे इकॉनॉमी क्लास तिकीट ४००० रुपये केले आहे. तर कराची ते रावळपिंडीचे एसी कोचचे तिकीट ८००० रुपये आहे, जे एका पाकिस्तानी प्रवाशासाठी खूप मोठी किंमत आहे. त्याचवेळी, कराची ते रावळपिंडी या बिझनेस क्लासचे भाडे १० हजार रुपयांनी आणि लाहोर ते कराची ९५०० रुपयांनी वाढले आहे.

 

Web Title: Railway fares increased in Pakistan, you will be surprised to see the ticket prices for 350 km distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.