आधी तीन मुलांचा जीव वाचवला, मग चौथ्याला वाचवताना स्वत:ही बुडाली १३ वर्षाची बहादूर अनुष्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 01:44 PM2021-08-25T13:44:02+5:302021-08-25T13:44:34+5:30
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना धौलपूरच्या धौलपुरा गावातील आहे. गावातील पार्वती नदीच्या तटावर काही लहान मुले रक्षाबंधनानंतर काही धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते.
राजस्थानच्या धौलपूरमधून एका १३ वर्षाच्या मुलीची बहादुरीची एक घटना समोर आली आहे. अनुष्का नावाच्या मुलीने नदीत बुडत असलेल्या ३ लहान मुलांचा जीव वाचवला. पण दुर्दैवाने चौथ्या मुलाला वाचवायला गेली अन अनुष्का स्वत:च पाण्यात वाहून गेली. यात अनुष्काचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीवर तिच्या बहादुरीसाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना धौलपूरच्या धौलपुरा गावातील आहे. गावातील पार्वती नदीच्या तटावर काही लहान मुले रक्षाबंधनानंतर काही धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. धार्मिक कार्यानंतर या मुलांनी नदीत आंघोळ करण्याच प्लॅन केला आणि त्यांनी नदीत उड्या घेतल्या.
नदीतील पाण्याचा वेग जास्त होता, ज्यामुळे तीन मुलं पाण्यात बुडू लागले होते. मुलांना पाण्यात बुडताना पाहून अनुष्काने आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. चारपैकी तीन मुलांना ती नदीच्या किनाऱ्यावर सुखरूप घेऊन आली. अशात अनुष्काने तिच्या ७ वर्षीय चुलत बहिणीला म्हणजे छविला पाण्यात बुडताना पाहिलं आणि पुन्हा तिने पाण्यात उडी घेतली. पण यावेळी अनुष्का ना बहिणीला वाचवू शकली ना स्वत: पाण्यातून बाहेर येऊ शकली.
आणखी एका बुडाला
राजस्थानच्या धौलपूरमधूनच आणखी एक ३२ वर्षीय व्यक्ती नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनुसार, या व्यक्तीचं नाव सोनू होत आणि तो यूपी आग्रा येथे राहणारा होता. सोनू रक्षाबंधनासाठी धौलपूरला गेला होता.