अधुरी प्रेम कहाणी! ८२ वर्षीय प्रियकराला ५० वर्षानंतर पुन्हा मिळालं पहिलं प्रेम, ऑस्ट्रेलियातील प्रेयसी परत येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:01 PM2021-04-02T16:01:29+5:302021-04-02T16:08:47+5:30

काही कारणास्तव दोघे वेगळे झाले. मात्र, ते वेगळे का झाले? आणि आता ५० वर्षांनी एकत्र का येताहेत? याबाबत 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या फेसबुक पेजवर हा पूर्ण किस्सा लिहिला आहे. चला जाणून घेऊ गेटकिपरची अधुरी प्रेम कहाणी...

Rajasthan 82 year old man got first love after 50 years know his love story | अधुरी प्रेम कहाणी! ८२ वर्षीय प्रियकराला ५० वर्षानंतर पुन्हा मिळालं पहिलं प्रेम, ऑस्ट्रेलियातील प्रेयसी परत येणार!

अधुरी प्रेम कहाणी! ८२ वर्षीय प्रियकराला ५० वर्षानंतर पुन्हा मिळालं पहिलं प्रेम, ऑस्ट्रेलियातील प्रेयसी परत येणार!

Next

तुम्ही कधी ऐकलं असेल की, पहिलं प्रेम एकदा तुमच्यापासून दूर गेलं तर ते पुन्हा मिळत नाही. पण राजस्थानच्या एका भूताच्या गावाच्या गेटकिपरला ५० वर्षानंतर त्याचं पहिलं प्रेम परत मिळालं. ७० च्या दशकात ऑस्ट्रेलियातील एक मुलगी राजस्थानमध्ये फिरायला आली होती. ती यादरम्यान या गेटकिपरच्या प्रेमात पडली. पण काही कारणास्तव दोघे वेगळे झाले. मात्र, ते वेगळे का झाले? आणि आता ५० वर्षांनी एकत्र का येताहेत? याबाबत 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या फेसबुक पेजवर हा पूर्ण किस्सा लिहिला आहे. चला जाणून घेऊ गेटकिपरची अधुरी प्रेम कहाणी...

८२ वर्षीय आजोबाने सांगितली लव्हस्टोरी

'माझं वय ३० वर्षे होतं जेव्हा मी पहिल्यांदा मरीनाला भेटलो होतो. ती वाळवंटात सफारीसाठी ऑस्ट्रेलियातून जैसलमेरला आली होती. मरीना पाच दिवसांसाठी आली होती आणि मी तिला उंटाची सवारी करणं शिकवलं. १९७० साल होतं. त्या काळात पहिल्या नजरेत प्रेम होत होतं. ठीक तसंच झालं. आम्ही दोघे पहिल्या नजरेत प्रेमात पडलो.

पूर्ण ट्रिप दरम्यान आम्ही सतत सोबत राहत होतो. ती ऑस्ट्रेलियाला परत जाण्याआधी ती मला I Love You म्हणाली. ते ऐकून मी पूर्णपणे लाल झालो होतो. मी ते दिवस अजिबात विसर शकत नाही. मी लाजलो होतो. तिने प्रेम व्यक्त केल्यावर मी तिला काहीच उत्तर देऊ शकलो नाही.

पण ती समजून गेली होती आणि मरीना परत गेल्यावर आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहिलो. ती मला दर आठवड्याला पत्र लिहित होती. आणि काही आठवड्यानंतर तिने मला ऑस्ट्रेलियाला बोलवलं. मला असं वाटत होतं की, मी चंद्रावरच आलो. माझ्या परिवाराला न सांगता मी ३० हजार रूपये उधार घेतले आणि मेलबर्नसाठी तिकिट खरेदी केलं. व्हिसा मिळवला. ते तीन महिने फारच कमाल होते. तिने मला इंग्रजी शिकवलं. मी तिला घूमर करणं शिकवलं. ती म्हणाली चल लग्न करूया आणि इथेच ऑस्ट्रेलियात राहुया. हे माझ्यासाठी अवघड होतं.

मला माझी मातृभूमी सोडून जायची नव्हती आणि तिला भारतात रहायचं नव्हतं. मी तिला म्हणालो की, 'हे जास्त काळ चालू शकणार नाही'. आणि आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे सोपं नव्हतं. ज्या दिवशी मी तिला सोडलं. ती त्या दिवशी फार रडत होती. पण माझा नाइलाज होता.

नंतर आमचं आयुष्य पुढे गेलं. काही वर्षांनी परिवाराच्या दबावामुळे मी लग्न केलं. त्यानंतर मी कुलधराचा गेटकिपर म्हणून नोकरी केली. नंतर मी विचार करायचो की, मरीनाने लग्न केलं असेल का? काय मी तिला पुन्हा बघू शकेल? पण माझी तिला पुन्हा पत्र लिहिण्याची हिंमत झाली नाही.

जसजसा काळ गेला आठवणीही धुसर होत गेल्या. मी माझ्या परिवाराच्या जबाबदारीत बिझी झालो. आणि दोन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचं निधन झालं. माझ्या सर्व मुलांचं लग्न झालं आणि ते त्यांचं जगत आहेत. मी ८२ वर्षाचा म्हातारा भारतातील भूताच्या गावात गेटकिपिंगची नोकरी करत राहिलो.

मी जसा विचार केला की, आता माझ्या आयुष्यात काही वेगळं घडणार नाही. तेव्हाच असं काही झालं. एक महिन्याआधी मला मरीनाचं पत्र आलं. तिने विचारले 'तू कसा आहेस माझ्या मित्रा?'. माझ्या अंगावर शहारे आले. ५० वर्षानंतरही तिने मला शोधलं. त्यानंतर ती मला रोज कॉल करते.

तिने मला सांगितले की, तिने कधीच लग्न केलं नाही आणि ती लवकरच भारतात येणार आहे. रामाची शपथ मला असं वाटत होतं की, मी पुन्हा २१ वर्षांचा झालोय. मला नाही माहीत की, भविष्य काय आहे. पण माझं पहिलं प्रेम माझ्या जीवनात परत आलंय, ते माझ्याशी रोज बोलतंय ही जाणीव मला कळत नाहीये'.
 

Web Title: Rajasthan 82 year old man got first love after 50 years know his love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.