पार्लरला जाते सांगून लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच बायको गायब, नंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 11:06 AM2021-05-25T11:06:22+5:302021-05-25T11:19:38+5:30
राजस्थानच्या अजमेरमधील अविनाश वर्मा नावाच्या तरुणाचं उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील सुलहकुल नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी एका वर्षापूर्वी लग्न झालं होता.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच (First Wedding Anniversary) बायको ब्यूटी पार्लरला जात असल्याचं कारण देत पसार झाल्याची घटना समोर आली आहे. बराच वेळ होऊनही ती परतली नसल्यान नवऱ्यानं तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण ती काही सापडली नाही. यानंतर तो लगेचच आग्र्याला तिच्या माहेरी पोहोचला. मात्र, तिच्या माहेरच्या लोकांनी दरजावाही उघडला नाही. त्याची बायको आपल्या माहेरीच पळून (Wife Run Away to Maternal Place) आली होती. तब्बल ३१ तास नवरा तिच्या घराबाहेर बसून राहिला. पण त्याला तिच्याशिवायच परतावं लागलं.
राजस्थानच्या अजमेरमधील अविनाश वर्मा नावाच्या तरुणाचं उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील सुलहकुल नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी एका वर्षापूर्वी लग्न झालं होता. अविनाश हा अकाउंटंट असून त्याचे वडील सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत. मात्र, चांगली नोकरी असतानाही अविनाश हुंड्यासाठी आपला छळ करत असल्याची तक्रार त्याच्या पत्नीनं महिला आयोगात केली. या प्रकरणाची चौकशी अजमेर पोलिसांकडे सोपवण्यात आली. यानंतर काही दिवसातच अजमेर पोलीस अविनाशच्या घरी पोहोचले. (हे पण वाचा : रहस्य! ३६५ राण्यांपैकी एकीसोबत रात्र घालवायची असल्यास तिची निवड कशी करायचा हा राजा?)
या घटनेनंतर अविनाशच्या आई-वडिलांनी त्याला संपत्तीतून बेदखल केलं. इतकंच नाही तर त्याला आपली नोकरीही गमवावी लागली. काही महिने गेल्यावर बायको त्याच्यासोबत फोनवर बोलत होती, मात्र ती घरी परत यायला तयार होत नव्हती. बायकोचा अंतिम निर्णय जाणून घेण्यासाठी अविनाश पुन्हा एकदा गेल्या शनिवारी तिच्या माहेरी गेला.
मात्र, अविनाश घरी येताच बायको आपल्या नातेवाईकांच्या घरी निघून गेली. अविनाशनंही तिच्या घराच्या बाहेरच बसून राहिला. अविनाशला या अवस्थेत पाहून शेजाऱ्यांनाही त्याची दया आली आणि त्यांनी अविनाशची झोपण्याची व्यवस्था करुन दिली. हे बरेच दिवस चाललं. पण त्याचा काही फायदा झाला नाही. अविनाशला पुन्हा मागे परतावं लागलं.