बाप रे बाप डोक्याला ताप, दारू पार्टी सुरू असताना टल्ली व्यक्तीने शिजवून खाल्ला साप आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 03:29 PM2021-11-19T15:29:32+5:302021-11-19T15:29:43+5:30

दुकान सुरू करण्याच्या आनंदात तिघांनी गावातील एका शेतात दारूची पार्टी ठेवली आणि दारू ढोसायला सुरूवात केली.

Rajasthan : Dholpur friends party roasted snake while drunk and ate | बाप रे बाप डोक्याला ताप, दारू पार्टी सुरू असताना टल्ली व्यक्तीने शिजवून खाल्ला साप आणि मग...

बाप रे बाप डोक्याला ताप, दारू पार्टी सुरू असताना टल्ली व्यक्तीने शिजवून खाल्ला साप आणि मग...

Next

चीनमधील लोक साप खातात किंवा त्यांचं सूप पितात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण भारतात मात्र असं कधी ऐकायला मिळालं नव्हतं. पण आता अशीच घटना समोर आली आहे. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात एका व्यक्तीने साप भाजून खाल्ला. ज्यामुळे त्याची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. ही घटना पीपरी पुरा गावातील आहे. इथे राहणारे तीन मित्र अतर सिंह, जोगिंदर आणि शिवरामने एका दुकान सुरू करण्याचा प्लॅन केला होता.

दुकान सुरू करण्याच्या आनंदात तिघांनी गावातील एका शेतात दारूची पार्टी ठेवली आणि दारू ढोसायला सुरूवात केली. दरम्यान शेतातील एका बिळातून एक साप बाहेर आला. जेव्हा दारूच्या नशेत टल्ली असलेल्या तिघांनीही साप पाहिला तर त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण साप पुन्हा बिळात शिरला. त्यानंतर मित्रांनी बिळात पाणी टाकून त्याला बाहेर काढलं.

त्यानंतर तिघांनी सापाला मारलं. त्यानंतर अतर सिंहने सापाचा मागचा आणि पुढचा भाग कापून फेकला. मग तिघांनीही मिळून सापाला आगीवर भाजलं आणि नशेत टल्ली तिसरा मित्र अतर सिंहने साप खाल्ला. साप खाल्ल्यावर अतर सिंहची तब्येत बिघडली. त्याची हालत गंभीर झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 

जेव्हा दुसऱ्या दिवशी अतर सिंह शुद्धीवर आला तेव्हा त्याने रात्री साप खाल्ल्याची माहिती दिली. ज्यानंतर हॉस्पिटलमधील स्टाफही हैराण झाले. अतर सिंहने सांगितलं की, त्याने सांगितलं की, तो आणि त्याचे मित्र जोगिंदर व शिवराम यांना दुकान सुरू करायचं होतं. ज्याच्या आनंदात त्यांनी दारूची पार्टी ठेवली होती. सध्या अतर सिंह धोक्यातून बाहेर आला आहे. 
 

Web Title: Rajasthan : Dholpur friends party roasted snake while drunk and ate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.