चोराने गिळंकृत केली सोन्याची साखळी, पोलिसांनी पोटभर खाऊ घातली केळी अन् दोन दिवसांनी मिशन फत्ते...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 01:21 PM2019-08-24T13:21:55+5:302019-08-24T13:27:05+5:30

पकडल्या जाण्याच्या भीतीने पोलिसांना पाहून चोर अनेकदा काहीना काही चुका करतातच. आणि दुसरीकडे पोलिसही चोरांकडून सत्य बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात.

Rajasthan police feed dozens of bananas to thief to retrieve swallowed gold chain | चोराने गिळंकृत केली सोन्याची साखळी, पोलिसांनी पोटभर खाऊ घातली केळी अन् दोन दिवसांनी मिशन फत्ते...

चोराने गिळंकृत केली सोन्याची साखळी, पोलिसांनी पोटभर खाऊ घातली केळी अन् दोन दिवसांनी मिशन फत्ते...

Next

पकडल्या जाण्याच्या भीतीने पोलिसांना पाहून चोर अनेकदा काहीना काही चुका करतातच. आणि दुसरीकडे पोलिसही चोरांकडून सत्य बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. पण यावेळी घटना जरा मजेदार आहे. राजस्थानच्या बीकानेरमध्ये एक चोराने पोलिसांना पाहून सोन्याची चेन गिळंकृत केली. आता ती बाहेर कशी काढायची तर यासाठी त्यांनी जे केलं ते फारच भन्नाट केलं.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २० ऑगस्ट रोजी दोन चोरांनी एका महिलेची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. चोरीच्या काही तासांनंतर लगेच पोलिसांनी चोरांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरांची ओळख पटली होती. पण जसेही पोलिसांनी दोघांना पकडले त्यातील एकाने सोन्याची साखळी गिळंकृत केली.

ज्याने हा कारनामा केला त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. एक्स-रे काढल्यावर त्यात सोन्याच्या साखळीचे तुकडे आढळले. आता ही साखळी कशी काढायची असा प्रश्न पडला असताना डॉक्टरांनी एंडोस्कोपिक सर्जरीऐवजी पोटॅशिअमयुक्त पदार्थ खाऊ घालण्याचा सल्ला दिला.

पोलिसांनी लगेच त्या चोराला एक डझन केळी आणि दोन पपई खाऊ घातल्या. दोन दिवसांनी २२ ऑगस्टला सकाळी पोलिसांचं मिशन फत्ते झालं. चोराच्या विष्ठेतून सोन्याची साखळी बाहेर आली.

दरम्यान, पोलिसांनी अशाप्रकारची दागिने परत मिळण्यासाठी पोलिसांनी पहिल्यांदाच अशी शक्कल लढवली नाही. याआधीही २०१८ मध्ये मुंबई पोलिसांनी महिलेचं मंगळसूत्र गिळंकृत करणाऱ्या चोराला दोन दिवस ९६ केळी खाऊ घातली होती.

Web Title: Rajasthan police feed dozens of bananas to thief to retrieve swallowed gold chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.