ऐकावं ते नवलच! दीड लाखांची नाणी घेऊन 'तो' पोहोचला iPhone घ्यायला; Video तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 03:36 PM2022-12-20T15:36:10+5:302022-12-20T15:43:39+5:30
दीड लाख रुपयांची नाणी घेऊन आयफोन 14 खरेदी करायला गेला होता.
राजस्थानमधील एक तरुण चक्क नाणी घेऊन आयफोन खरेदी करायला एप्पल स्टोअरमध्ये गेला होता. याचा एक व्हि़डीओ देखील व्हायरल झाला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुलगा दीड लाख रुपयांची नाणी घेऊन आयफोन 14 खरेदी करायला गेला होता. दुकानदाराने नाणी पाहताच तो भडकला. दुकानदार आणि मुलामध्ये वाद झाला. तसेच दुकानात नाणी ठेवलेली देखील पाहायला मिळत आहेत.
अमित शर्मा असं या तरुणाचं नाव आहे. अमित शर्मा हा एक यूट्यूबर असून त्याचं Crazy XYZ नावानं यूट्यूब चॅनल आहे. यावर तो आयफोन खरेदीचा व्हिडीओ पाहायला मिळतो. अमित शर्माने शेवटी हा एक प्रँक होता, असं सांगितलं. या व्हिडीओला दोन दिवसात 35 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला अमित त्याच्या मित्रासोबत मोठ्या प्रमाणावर नाणी घेऊन आलेला दिसतो. त्याच्यापुढे एक बॅग आणि पाणी भरण्याचा टब पाहायला मिळाला त्यात नाणी होती.
व्हिडिओत एप्पल स्टोअरमध्ये आयफोन 14 खरेदीसाठी अमित पैसे देत असताना दिसून येतो. त्यामध्ये दुकानदार पैसे मागताच अमित त्याच्या पुढं नाण्यांचा ढीग ठेवतो. हे पाहून काही तिथं उपस्थित असलेले अनेकजण हैराण होतात. नाणी मोजण्यावरुन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद सुरू होतो. दुसरीकडे अमित आणि त्याचा मित्र जमिनीवर नाणी ठेवतात. अमित शर्माने यानंतर मोबाईलची रक्कम 84 हजार रुपये घेऊन उरलेले पैसे माघारी द्या, असं म्हटलं.
दुकानदारानं एवढी नाणी कोण मोजणार असा सवाल केला. नाणी मोजण्यावरुन दोघांमध्ये वाद होतो. दुकानदारानं अमित शर्माला पोलीस ठाण्यात एफआयआर करण्याचा इशारा दिला. अखेर अमित शर्माने ऑनलाईन पेमेंट केलं आणि मोबाईल खरेदी केला. यानंतर त्यानं प्रँक करत असल्याचं सांगितलं. दुकानदाराला त्रास देण्याचा हेतू नव्हता. अमितचा व्हिडीओ यूट्यूबवर ट्रेंड होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"