भारतातील या विहिरीच्या आत आहे ३० किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग, जाणून घ्या रहस्य..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 02:46 PM2021-05-28T14:46:42+5:302021-05-28T14:50:24+5:30
हे तर सर्वानाच माहीत आहे की, जुन्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात विहिरी खोदल्या जात होत्या. काही विहिरी तर हजारो-लाखो वर्ष जुन्या आहेत.
जगभरात अनेक आश्चर्यकारक, हैराण करणाऱ्या गोष्टी बघायला-वाचायला मिळतात. वेळोवेळी या गोष्टींचे रहस्य उलगडत जातात. अनेकदा तर सत्य असं असतं ज्यावर विश्वास ठेवणंही अवघड होऊन बसतं. भारतातही अशा अनेक गोष्टी आहेत. आज आम्ही तुम्हाला एका अशाच गोष्टीबाबत सांगणार आहोत, ज्याबाबत वाचल्यावर तुम्ही हैराण व्हाल. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, पाण्यासाठी पूर्वी विहिरी खोदल्या जात होत्या. या विहिरींची वापर पाण्यासाठीच केला जात होता. पण एक विहीर अशीही आहे जिच्या आथ ३० किलोमीटर लांब भुयार आहे. चला त्या विहिरीबाबत जाणून घेऊ...
हे तर सर्वानाच माहीत आहे की, जुन्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात विहिरी खोदल्या जात होत्या. काही विहिरी तर हजारो-लाखो वर्ष जुन्या आहेत. अशाच एका विहिरीची कहाणी आम्ही सांगणार आहोत. गुजरातच्या पाटणमध्ये एक 'राणी की बावडी' नावाचे विहीर आहे. याला बावडी यासाठी म्हटलं जातं कारण या विहिरीला पायऱ्या आहेत. असं सांगितलं जातं की, ही विहीर ९०० वर्ष जुनी आहे. इतकंच नाही तर या विहिरीला हेरिटेज घोषित करण्यात आलं आहे. (हे पण वाचा : आश्चर्य! भारतातील असं एकमेव मंदिर जिथे देवी मातेला अर्पण केला जातो 'चपलांचा हार')
असं सांगितलं जातं की, १०६३ ईसवीमध्ये सोळंकी राजवंशाचे राजा भीमदेव प्रथम यांच्या स्मृतीत त्यांची पत्नी राणी उदयामती यांनी ही विहीर बनवली होती. ही विहीर ६४ मीटर लांब, २० मीटर रूंद आणि २७ मीटर खोल आहे. इतकंच नाही तर या विहिरीत ३० किलोमीटर आत भुयारही आहे. ही भुयारी मार्ग पाटणच्या सिद्धपूरमध्ये निघतो. असे म्हटले जाते की, या भुयारी मार्गाचा वापर राजा आणि त्यांच्या परिवार कठिण काळात करत होते. सध्या यातील भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. ही विहीर बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात.