दोन तोंडाच्या दुर्मीळ कासवाने घेतला इथे जन्म, पाहून वैज्ञानिकही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 03:19 PM2021-10-14T15:19:45+5:302021-10-14T15:21:19+5:30
फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, सामान्य अशा स्थितीत जन्माला येणारे जीव जास्त काळ जिवंत राहत नाहीत हा दोन तोंडाचा कासव सध्या चांगलं जीवन जगत आहे.
अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्समध्ये दोन तोंडाचा एक दुर्मीळ कावस जन्माला आला आहे. हा कासव फारच सक्रीय आहे. त्याची सक्रियता पाहून वैज्ञानिकही हैराण झाले आहेत. ते त्याची पूर्ण काळजी घेत आहेत. सामान्यपणे असे जीव जास्त दिवस जिवंत राहत नाहीत. सध्या हा दोन तोंडाचा कासव व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे आणि सक्रीय आहे.
मॅसाच्युसेट्स येथी न्यू इंग्लंड वाइल्डलाईफ सेंटरने आपल्या फेसबुक पेजवर लिहिलं आहे की, हा छोटा कासव एक डायमंडबॅक टेरापिन्स प्रजातीचा कासव आहे. वैज्ञानिक भाषेत याला मालाक्लेमिस टेरापिन म्हणतात. हा फारच दुर्मीळ प्रजातीचा कासव आहे. सोबतच हा फार अॅक्टिव आणि अलर्ट आहे. फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, सामान्य अशा स्थितीत जन्माला येणारे जीव जास्त काळ जिवंत राहत नाहीत हा दोन तोंडाचा कासव सध्या चांगलं जीवन जगत आहे. जेनेटिक किंवा पर्यावरणीय कारणांमुळे भ्रूणात असे बदल होतात.
बायसिफॅली म्हणजे दोन तोंडाचा सामान्यपणे जिवंत राहत नाही. याआधी व्हर्जिनियामध्ये दोन तोंड असलेला वायपर साप मिळाला होता. तो काही तासांनीच मरण लावला होता. मिनेसोटामध्ये दोन तोंडाचं हरिण सापडलं होतं. तेही काहीच दिवस जगलं.
सध्या मॅसाच्युसेट्स येथील न्यू इंग्लंड वाइल्डलाईफ सेंटरमध्ये या दोन तोंडाच्या कासवाची काळजी घेतली जात आहे. याचा जन्म होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ झाला. हा कासव सध्या चांगलाच अलर्ट आहे. वाइल्डलाइफ सेंटरमध्ये एक्स-रे काढून या कासवाबाबत आणखी माहिती मिळवली. कारण दोन तोंड असण्याचा अर्थ म्हणजे दोन वेगवेगळ्या दिशांमध्ये जाण्याची समस्या.