अरे व्वा! तब्बल १२४ वर्षांनी चमोली पर्वतांवर फुललं दुर्मिळ प्रजातीचं फुल; पाहा फोटो
By manali.bagul | Published: September 21, 2020 02:33 PM2020-09-21T14:33:59+5:302020-09-21T14:42:43+5:30
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे फुलं लिपॅरिस पिगमेइया (Liparis Pygmaea) या नावानं ओळखलं जातं.
दुर्मिळ प्रजातींची फुलं किंवा वनस्पती फार क्वचित पाहायला मिळतात. तुमचा वाचून विश्वास बसणार नाही पण १२४ वर्षांनंतर दुर्मिळ प्रजातीचं फुलं दिसून आलं आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे फुलं लिपॅरिस पिगमेइया (Liparis Pygmaea) या नावानं ओळखलं जातं. सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये ही फुलं १०० वर्षांआधी दिसून आली होती. आता पश्चिमी हिमालय क्षेत्रात उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ही सुंदर फुलं दिसून आली आहेत. दोन महिन्यांआधीही वन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली होती.
भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थानातील वनस्पती विज्ञान विशेषज्ञांनी या फुलांवर संशोधन केले होते. याचा अहवाल ३० जुलैला फ्रेंच साईंटिफीक जनरल रिर्चडायनामध्ये प्रकाशित करण्यात आला होता. यानुसार जवळपास जगभरात लिपॅरिस पिगमेइयाच्या ३२० प्रजाती आहेत. यातील ४८ प्रजाती भारतात आहेत. तर १० प्रजाती जगभरातील इतर ठिकाणी आढळतात.
चमोली जिल्ह्यात ३ हजार ८०० किमी उंचावर असलेल्या स्पकुडं ट्रकवर हे अद्भूत आणि दुर्मिळ फूल दिसून आलं आहे. वन अधिकारी हरिश नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंड वन विभागातील दोन अधिकाऱ्यांनी जून महिन्यात दोन फुलं दिसतील असा अंदाज वर्तवला होता. जुनिअर रिसर्च तज्ज्ञ मनोज सिंह यांनी सांगितले की, हे फुल दिसून आल्यानंतर पुण्यातील बॉटेनिकल सर्वे ऑफ इंडियाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे.
पुण्यातील भारतीय वनस्पती सर्वेक्षणाचे पश्चिमी रिजनल सेंटरचे प्रमुख डॉ. जीवन लाल यांनी सांगितले की, ''दुर्मिळ प्रजातीचे हे फुल जून महिन्यापर्यंत ५ सेंटीमीटरपर्यंत वाढतं. या फुलांच्या १२५० ते २५० प्रजाती या उत्तराखंडच्या पर्वतांमध्ये दिसून येतात'' डॉक्टर जलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार हे फुल १८७७ आणि १८९२ मध्ये दिसून आलं होतं. १८६९ ला बंगालमध्येही हे फुल फुलले होते. अनेक वर्षांनी हे फुल पुन्हा दिसल्यामुळे हिमालयाच्या संरक्षणासाठी एक मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं.
हे पण वाचा-
काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ
सभागृहात टॉपलेस तरूणीचा फोटो बघताना आढळला खासदार, म्हणे - 'तिला मदत करत होतो'
शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा
बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ
लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...