काळे-पांढरे पट्टे असलेला झेब्रा तुम्ही अनेकदा पाहिला असेल, पण 'असा' कधी पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 02:34 PM2019-09-18T14:34:23+5:302019-09-18T14:44:25+5:30

झेब्रा म्हटला की, कुणाच्याही डोळ्यांसमोर लगेच एक काळे-पांढरे पट्टे असलेला सुंदर प्राणी येतो. झेब्रा हा घोड्याच्या प्रजातीतील प्राणी आहे.

A Rare 'Spotted' Zebra Seen In Kenya's Maasai Mara Wildlife Reserve | काळे-पांढरे पट्टे असलेला झेब्रा तुम्ही अनेकदा पाहिला असेल, पण 'असा' कधी पाहिलाय का?

काळे-पांढरे पट्टे असलेला झेब्रा तुम्ही अनेकदा पाहिला असेल, पण 'असा' कधी पाहिलाय का?

googlenewsNext

झेब्रा म्हटला की, कुणाच्याही डोळ्यांसमोर लगेच एक काळे-पांढरे पट्टे असलेला सुंदर प्राणी येतो. झेब्रा हा घोड्याच्या प्रजातीतील प्राणी आहे. केनियातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात झेब्रा आढळतात. केनियात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात. त्यात झेब्र्याचाही समावेश आहे. 

(Image Credit : www.theeastafrican.co.ke)

झेब्रा कसा दिसतो हे कुणीची पटकन सांगेल. पण अलिकडेच एक वेगळा झेब्रा बघायला मिळाला. The East African ने दिलेल्या वृत्तानुसार, एका फोटोग्राफरने एका अनोख्या झेब्र्याचा फोटो क्लिक केला. हा झेब्रा इतर झेब्र्यांसारखा काळे-पांढरे पट्टे असलेला नव्हता तर काळे-पांढरे ठिपके असलेला होता. केनियाच्या Maasai Mara Wildlife Reserve मध्ये हा झेब्रा आढळला.

(Image Credit : www.ladbible.com)

Antony Tira या प्रसिद्ध फोटोग्राफर-गाईडने या इतर झेब्राहून वेगळ्या दिसणाऱ्या झेब्र्याचा फोटो फेसबुकवर शेअर केलाय. त्यांनीच पहिल्यांदा हा झेब्रा पाहिला. तर हा फोटो ४१ वर्षीय भारतीय फोटोग्राफर राहुल सचदेवा यांनी क्लिक केला आहे. 

(Image Credit : www.ladbible.com)

हे झेब्र्याचं पिलू असं का वेगळं आहे? तर या झेब्र्याला जन्मताच melanism ही समस्या आहे. त्यामुळेच त्याच्या अंगावर पट्टे नाही तर ठिपके आहेत.

(Image Credit : www.ladbible.com)

स्थानिकांनी सांगितले की, अशाप्रकारची समस्या असलेला झेब्रा ६ महिन्यांपेक्षा अधिक जगत असल्याचं त्यांनी पाहिलं नाही. Antony Tira यांनी हा झेब्रा पहिल्यांदा पाहिला म्हणून त्यांचं नाव Tira या झेब्र्याला देण्यात आलं आहे.

Web Title: A Rare 'Spotted' Zebra Seen In Kenya's Maasai Mara Wildlife Reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.