बाबो! अडीच अब्ज किंमतीच्या चष्म्याचा होणार लिलाव, भारताच्या शाही खजिन्याचा होता भाग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 01:05 PM2021-10-08T13:05:18+5:302021-10-08T13:13:36+5:30
या अनोख्या चष्म्यांची कहाणी १७व्या शतकातील मुघल भारतमध्ये सुरू झाली होती. तेव्हा शाही धन, वैज्ञानिक ज्ञान आणि कलात्मक प्रयत्न एकत्र शिखरावर पोहोचले होते.
मुघल काळातील भारतातील एका अज्ञात खजिन्यातील १७व्या शतकातील दर्मीळ रत्नाचे दोन चष्मे पहिल्यांदा लिलावासाठी ठेवले जातील. सोथबीज लंडनमध्ये गुरूवारी याची घोषणा करण्यात आली. एका अंदाजानुसार, या दोन्ही चष्म्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे.
नावंही आहे अजब
हिरे लावलेल्या च्ष्म्याला 'हलो ऑफ लाइट' नाव देण्यात आले आहे. तेच पन्ना हिरा असलेल्या चष्म्याला 'गेट ऑफ पॅराडाइज' म्हणण्यात आलं आहे. दोन्ही चष्मे २२ ऑक्टोबरपासून सोथबीज लंडनमद्ये प्रदर्शित केले जातील आणि २७ ऑक्टोबरला त्यांचा लिलाव करण्यात येईल.
इतिहासकारांसाठी मोठा चमत्कार
मध्य पूर्व आणि भारतासाठी सोथबीजचे अध्यक्ष एडवर्ड गिब्स म्हणाले की, अर्थातच रत्नांच्या तज्ज्ञांसाठी आणि इतिहासकारांसाठी हा चमत्कार आहे. ते म्हणाले की, हा खजिना समोर आणणं आणि जगाला त्यांच्या निर्माणाच्या रहस्यावर आश्चर्य व्यक्त करण्याची संधी देणं एक वास्तविक रोमांच आहे.
१७व्या शतकातील आहेत चष्मे
या अनोख्या चष्म्यांची कहाणी १७व्या शतकातील मुघल भारतमध्ये सुरू झाली होती. तेव्हा शाही धन, वैज्ञानिक ज्ञान आणि कलात्मक प्रयत्न एकत्र शिखरावर पोहोचले होते. एका अज्ञात राजकुमाराच्या सांगण्यावरून एका कलाकाराने एका हिऱ्याला हा आकार दिला. ज्याचं वजन २०० कॅरेटपेक्षा जास्त होतं. तेच शानदार पन्ना हिऱ्याचं वजन कमीत कमी तीनशे कॅरेट होतं. त्यांनी याला उत्कृष्ठ आकार दिला. एका अंदाजानुसार, या चष्म्यांची किंमत १५ लाख आणि २५ लाख पाउंड असेल.