12 लाख रूपयांना विकली जात आहे चहाची ही केटली, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 11:04 AM2023-09-05T11:04:53+5:302023-09-05T11:06:42+5:30
Rare Teapot : फार दुर्मिळ आणि प्राचीन चहाची ही केटली ब्रिटनचे राजा एडवर्ड सातवे यांच्यासाठी बनवण्यात आली होती.
Rare Teapot : आजही काही लोकांच्या घराच चहासाठी कॅटली वापरली जाते. सामान्यपणे चहाची केटली ही अॅल्युमिनिअमची किंवा चीनी मातीची असते. जी बाजारात काही स्वस्तात मिळून जाते. पण आज आम्ही तुम्हाला एका असा केटली बाबत सांगणार आहोत जिची किंमत 12 लाख रूपये ठेवण्यात आली आहे. इतकंच नाही तर ही केटली खरेदी करण्यासाठी लोकांची लाईन लागली आहे. चला जाणून घेऊ याचं कारण..
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, फार दुर्मिळ आणि प्राचीन चहाची ही केटली ब्रिटनचे राजा एडवर्ड सातवे यांच्यासाठी बनवण्यात आली होती. सात इंच लांब ही अनोखी केटली 1876 मध्ये विलियम्स गूडने मिंटन चीनी मातीने तयार केली होती. जी फारच सुंदर आहे. ही केटली तत्कालीन वेल्सची राजकुमारी एलेक्जेंड्राने आपले पती एडवर्डसाठी गिफ्ट म्हणून बनवली होती. जे विक्टोरियाच्या मृत्यूनंतर 1901 मध्ये राजा बनले होते.
येत्या 19 सप्टेंबर रोजी या केटलीचा लिलाव होणार आहे. लिलाव संस्थेने सांगितलं की, ही विक्टोरिअन शैलीतील एक खास वस्तू आहे. जी लोकांना खूप आवडत आहे. आता लोक याबाबत माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. किंग एडवर्ड सातवे ब्रिटनची महाराणी विक्टोरियाचे सगळ्या मोठे पुत्र होते.
जगातली सगळ्यात महाग केटली
जगातील सगळ्यात महागडी केटली ब्रिटनची एक स्वयंसेवी संस्था एन सेठिया फाउंडेशनकडे आहे. ही 18 कॅरेट सोन्यापासून बनवली आहे. तसेच याच्या चारही बाजूने हिरे लावण्यात आले आहेत. इतकंच नाही तर या केटलीच्या मधे 6.67 कॅरेटचा रूबी हिराही लावण्यात आला आहे. ‘गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स’ नुसार, 2016 मध्ये या केटलीची किंमत 24 कोटी 80 लाख 418 रूपये लावण्यात आली होती.