इथे आढळून आला दोन तोंडाचा दुर्मीळ साप, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 04:54 PM2022-07-01T16:54:51+5:302022-07-01T16:59:26+5:30
Two Headed Snake : या रात्री फिरणारा साप आहे. तो विषारीही नसतो. सामान्यपणे त्यांची लांबी 30 इंच असते. पण हा दोन तोंड्या साप केवळ 30 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे हा साप पिल्लू आहे.
Two Headed Snake : दक्षिण आफ्रिकेच्या वेदवे भागात एक दुर्मीळ दोन तोंड असलेला साप पकडण्यात आला आहे. जिथे हा साप आढळून आला तेथील त्या जागेच्या मालकाने त्याला काचेच्या भांड्यात ठेवलं होतं. त्यानंतर सर्पमित्र निक इवांसला बोलवलं. जेणेकरून तो सापाला घेऊन जाऊ शकेल. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर सापाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी लिहिलं की, उत्तर डर्बनच्या ब्राय भागात होतो. तेव्हा मला वेदवेहून काही फोटो आले. हे फोटो दोन तोंड्या सापाचे होते. हा एक साउदर्न ब्राउन एग ईटर साप आहे. तो कोणतंही नुकसान पोहोचवत नाही.
या रात्री फिरणारा साप आहे. तो विषारीही नसतो. सामान्यपणे त्यांची लांबी 30 इंच असते. पण हा दोन तोंड्या साप केवळ 30 सेंटीमीटरचा आहे. म्हणजे हा साप पिल्लू आहे. निक इवांस यांनी सांगितलं की, दोन तोंड असलेल्या सापांसोबत एक मोठी समस्या असते. ती म्हणजे कोणत्या दिशेने जायचं. एका डोकं दुसऱ्या दिशेला तर दुसरं दुसऱ्या दिशेला जात असतं.
(Image Credit : Nick Iwans)
निक यांना आढळून आलं की, हा साप झोपताना एका डोक्यावर दुसरं डोकं ठेवतो. हा साप अंडी खातो. याला दात नसतात, पण तरीही तो एकदाच अनेक अंडी खाऊ शकतो. इतकंच काय तर पूर्ण अंडही गिळू शकतो.
सामान्यपणे दोन तोंड असलेले साप कमीच बघायला मिळतात. या स्थितीला बायसिफॅली असं म्हणतात. जेव्हा हे जुळे जन्मावेळी वेगळे होऊ शकत नाही तेव्हा अशी स्थिती तयार होते. दहा हजार सापांमध्ये अशी एक केस असते. पण असे साप जास्त काळ जिवंत राहण्याची शक्यता कमीच असते.
(Image Credit : Nick Iwans)
हा दोन तोंड्या साप आता निक इवांसकडून प्रोफेशनल लोकांकडे देण्यात आला. ते त्याच्या आरोग्याची काळजी घेतील. काही दिवस त्याच्यावर अभ्यास करून त्याला जंगलात सोडतील. कारण वैज्ञानिकांना वाटतं की, त्याने जास्त काळ जगावं, त्यासाठी त्याला जंगलात सोडावं लागेल.