जगातल्या सर्वात मोठ्या आणि दुर्मिळ पोपटांचा अंडी देण्याचा रेकॉर्ड, केवळ रात्री दिसतात हे पोपट!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 11:36 AM2019-04-23T11:36:03+5:302019-04-23T11:41:31+5:30
जगातल्या सर्वात लठ्ठ आणि दुर्मिळ काकापो प्रजातीच्या पोपटाने प्रजननाचा एक नवा रेकॉर्ड कायम केला आहे.
जगातल्या सर्वात लठ्ठ आणि दुर्मिळ काकापो प्रजातीच्या पोपटाने प्रजननाचा एक नवा रेकॉर्ड कायम केला आहे. न्यूझीलॅंडचे संशोधक डॉ. डिग्बी यांच्यानुसार, नुकतेच या खास प्रजातीच्या मादा पोपटांनी २४९ अंडी दिली आणि ज्यातून आतापर्यंत ८९ पिलांचा जन्म झाला. यांना वाचवण्यासाठी सतत प्रयत्न सुरु आहेत.
काकापोचा अर्थ होतो रात्री दिसणारे पोपट. हे फार दुर्मिळ प्रजातीचे पोपट मानले जातात. त्यांची संख्या अशीच कमी होत राहिली तर ५० वर्षात नाहीसे होतील. नर पोपटाचे वजन साधारण ४ किलो असतं आणि वजन पाहूनच मादा पोपट त्यांना संबंधासाठी निवडतात.
५० वर्षांपूर्वी लागला शोध
न्यूझीलॅंडच्या संधोकांचं म्हणणं आहे की, जलवायु परिवर्तन या पोपटांच्या या प्रजातीसाठी फार फायदेशीर ठरली आहे. ज्यामुळे ब्रीडिंग सीजनमध्ये त्यांच्या मेटिंगच्या अनेक घटना बघण्यात आल्यात. याने त्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. १९७० मध्ये अशा १४७ पोपटांना शोधण्यात आलं होतं. त्यांचा रंग हिरवा, पिवळा आणि काळा होता.
२ ते ४ वर्षात एकदा होते मेटिंग
डॉ. डिग्बी यांच्यानुसार, हे पक्षी खासप्रकारचे आहेत, त्यांच्या ब्रीडिंग प्रकियेवर मादा पोपटाचं नियंत्रण राहतं. यांचं मेटिंग दर दोन किंवा चार वर्षातून एकदा होतं. ब्रीडिंग सीजनवेळी मादा त्यांचा पार्टनर निवडतात. मेटिंगनंतर नर पोपटासोबत त्यांचा संबंध संपतो आणि पिलांचा जन्म होईपर्यंत त्याला घरट्यातून बाहेर केलं जातं.
(Image Credit : National Audubon Society)
डॉ. डिग्बी सांगतात की, यावेळी मेटिंगच्या घटना वेगाने वाढत आहेत. पण याचं आणकी प्रमुख कारणही आहे. यांचं मेटिंग न्यूझीलॅंडमध्ये लागलेल्या रिमूच्या झाडांवर झाली आहे. या झाडाच्या फळांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर असतं. व्हिटॅमिन डी चा थेट संबंध फर्टिलिटी आणि आरोग्याशी असतो.
डॉक्टर सांगतात की, रिमूच्या झाडांना फळं यावेळी फळंही भरपूर लागली आहेत. जलवायु परिवर्तन आणि तापमानात बदल झाल्याने झाडांना भरपूर फळं आली असावीत. ज्याचा प्रभाव या पक्ष्यांच्या संख्येवरही बघायला मिळतोय.
रेडिओ ट्रान्समीटरने होते मॉनिटरिंग
काकापोची संख्या वाढण्याचा प्रोजेक्ट फार काळजीपूर्वक चालवला जात आहे. प्रत्येक पोपटाच्या शरीरात रेडिओ ट्रान्समीटर लावण्यात आला आहे. जेणेकरुन मॉनिटरिंग केली जावी. डॉ. डिग्बी यांच्यानुसार, वर्तमानात ५० मादा आहेत, ज्यातील ४९ ने मिळून २४९ अंडी दिली आहेत. ज्यातील ८९ पिलांचा जन्म झाला आहे.