रावणावर करण्यात नव्हते आले अंत्यसंस्कार, या गुहेत आजही आहे त्याचा मृतदेह?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 04:11 PM2022-10-06T16:11:34+5:302022-10-06T16:11:42+5:30
असं सांगितलं जातं की, श्रीलंकामध्ये रामायण आणि भगवान रामाशी संबंधित अनेक पुरावे आहेत.
दसऱ्याच्या दिवशी भगवान रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. हिंदू धर्मात दसरा म्हणजे विजयादशमीला फार महत्व आहे. या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला रामायणाबाबत काही रहस्य सांगणार आहोत. ज्यांबाबत तुम्हाला कल्पनाही नसेल..
असं सांगितलं जातं की, श्रीलंकामध्ये रामायण आणि भगवान रामाशी संबंधित अनेक पुरावे आहेत. यांबाबत जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. श्रीलंकेमधील अनेक स्थळं आजही भगवान राम आणि रावणाबाबत काहीना काही सांगतात. नवरात्र संपल्यानंतर दसरा साजरा केला जातो. ज्याला विजयादशमी म्हटलं जातं. धार्मिक मान्यतांनुसार, दशमीच्या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता.
या गुहेत ठेवलं आहे रावणाचं शीर
काही मान्यतांनुसार, जवळपास 50 अशी ठिकाणं आहेत ज्यांचा रामायणाशी संबंध आहे. काही शोधात सांगण्यात आलं आहे की, श्रीलंकेतील एका जंगलात डोंगरावर एक गुहा आहे. या गुहेत आजही रावणाचं शीर ठेवण्यात आलं आहे. ही गुहा श्रीलंकेतील रैगलाच्या घनदाट जंगलात आहे. मान्यता आहे की, भगवान रामाने 10 हजार वर्षाआधी रावणाचा वध केला होता.
असं सांगितलं जातं की, रैगलाच्या जंगलात 8 हजार फूट उंचीवर स्थित या गुहेत राणवाचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. रावणाचा मृतदेह ममी बनवून एका बॉक्समध्ये ठेवण्यात आला आहे. ज्यावर एक खास लेप लावण्यात आला आहे. ज्यामुळे हजारो वर्षानंतरही तो तसाच आहे.
श्रीलंकेतील इंटरनॅशनल रामायण रिसर्च सेंटरने हा रिसर्च केला. या रिसर्चनुसार, ज्या बॉक्समध्ये रावणाचा मृतदेह ठेवला आहे तो 18 फूट लांब आणि 5 फूट रूंद आहे. हेही सांगण्यात येतं की, या बॉक्सच्या खाली रावणाचा मूल्यवान खजिना आहे. ज्याची सुरक्षा एक नाग आणि काही खतरनाक प्राणी करतात.
मान्यता आहे की, भगवान रामाने रावणाचा वेध केल्यानंतर त्याचा मृतदेह विभीषणकडे सोपवला होता. जेणेकरून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे. पण विभीषणाने गादी सांभाळण्याच्या घाईत अंत्यसंस्कार केले नाही आणि मृतदेह तसाच सोडला.
इंटरनॅशनल रामायण रिसर्च सेंटर द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला की, हेही माहीत मिळवण्यात आली आहे की, रावणाची अशोक वाटिका कुठे होती आणि त्याचं पुष्पक विमान कुठे उतरत होतं. त्याशिवाय भगवान हनुमानाच्या पायांच्या खुणाही शोधण्याचा दावा करण्यात आला आहे. पण अजूनही या गोष्टी सिद्ध करण्यात आलेल्या नाहीत.