भारतातील असं ठिकाण जिथे सामान्य लोक येऊन शोधतात हिरे, जाणून घ्या कुठे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 12:23 PM2021-09-18T12:23:18+5:302021-09-18T12:25:43+5:30

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात.

Rayalaseema in Andhra Pradesh is called the land of diamonds and people come here in search of diamonds | भारतातील असं ठिकाण जिथे सामान्य लोक येऊन शोधतात हिरे, जाणून घ्या कुठे...

भारतातील असं ठिकाण जिथे सामान्य लोक येऊन शोधतात हिरे, जाणून घ्या कुठे...

googlenewsNext

जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे मनुष्य तुम्हाला सोनं बहुमूल्य दगड किंवा हिरे शोधताना दिसतात. तेच आश्चर्याची बाब म्हणजे या गोष्टी त्यांना सापडतात सुद्धा. असंच एक ठिकाण भारतातही आहे. इथे लोक खुल्या मैदानात, शेतात हिरे शोधतात. चला जाणून घेऊ कुठे आहे हे ठिकाण...

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशातील रायलसीमा क्षेत्राला 'हिऱ्यांची भूमी' म्हटलं जातं.. कारण इथे मोठ्या प्रमाणात खनिज भांडार आहे आणि लोक इथे येऊन हिरे शोधतात. Geological Survey of India नुसार, पेरावली, तुग्गाली, जोन्नागिरी आणि वजराकरूर सारख्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिरे आहेत.

दूरदूरून लोक हिरे शोधायला येतात

हिरे सापडत असल्याची माहिती आजूबाजूच्या गावातील लोकांनाही आहे. ते नेहमीच इथे हिरे शोधायला येतात. ते आजूबाजूच्या राज्यातील लोकही हिऱ्याच्या शोधात इथे पोहोचतात. लोक त्यांची मजुरी सोडून इथे हिरे शोधायला येतात. त्यांना अपेक्षा असते की हिरा त्यांचं नशीब बदलेल. बीबीसीसोबत बोलताना गुंटूरमधील एक व्यक्ती म्हणाले की, त्यांच्या एका मित्राला  इथेच हिरा सापडला होता. त्यामुळे तेही त्यांचं नशीब पारखण्यासाठी इथे येतात.

कसे शोधतात हिरे ?

रिपोर्टनुसार इथे हिऱ्याच्या शोधात आलेले लोक कोणत्याही विशेष टेक्नीकचा वापर करत नाही. त्यांना जो दगड वेगळा आणि खास दिसतो तो ते उचलतात. हे लोक सूर्य किंवा चंद्र किरणांच्या प्रतिबिंबाच्या आधारावर हिरे शोधण्याच्या जागेची निवड करतात.

कुठे विकतात?

इथे सापलेले हिरे खरेदी करणारे इथे भरपूर लोक आहेत. ते लोकांकडून हिरे खरेदी करतात. पण फार जास्त किंमत देत नाहीत. नंतर तेच लोक हे हिरे  मोठ्या किंमतीत विकतात. मुळात हे एक फारच मेहनतीचं आणि पेशन्सचं काम आहे. यात नशीबाचाही मोठा खेळ आहे.

हिरे जमिनीतून वर येतात

Geological Survey of India चे उप-निर्देशक राजा बाबू म्हणाले की आंध प्रदेशातील दोन जिल्हे करनूल आणि अनंतपूरसोबत तेलंगणातील महबूबनगर हे खनिज संपत्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्यानुसार, जेव्हा जमिनीच्या खाली काही नैसर्गिक बदल होतो, तेव्हा जमिनीच्या आतील हिरे जमिनीच्या वर येतात.

काळा दगड

जीएसआयनुसार, या भागांमध्ये हिरे जमिनीच्या वर येणाचं मुख्य कारण ५ हजार वर्षात झालेलं मृदा क्षरण म्हणजे Soil Erosion हेही आहे. अधिकारी सांगतात की, पृथ्वीच्या १४०-१९० फूट खोलात असलेलं कार्बन अणु दबाव आणि जास्त तापमानामुळे हिऱ्या रूपांतरित होतं. तेच जेव्हा पृथ्वीत स्फोट होऊन लाव्हारस बाहेर येतो, हा लाव्हा नंतर काळा दगड बनतो. ज्याला किम्बरलाइट आणि लॅम्प्रोइट पाइप असंही म्हणतात.  हे पाइप हिऱ्यांसाठी स्टोर हाउससारखं काम करतात. 
 

Web Title: Rayalaseema in Andhra Pradesh is called the land of diamonds and people come here in search of diamonds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.