पाहा आता कसा दिसतो रिअल लाईफ मोगली, शिक्षण घेऊन झालाय मोठा माणूस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 07:53 PM2022-07-28T19:53:49+5:302022-07-28T19:56:05+5:30
जन्मजात दोषामुळे झांझिमान एल्लीचा लूक (Look) इतर मुलांपेक्षा वेगळा होता. गावातल्या व्यक्ती त्याला माकड (Monkey) म्हणून चिडवायचे. या गोष्टीला चिडून तो घरातून पळून जायचा. त्याचे हावभाव बघून लोक त्याला मोगली म्हणू लागले. परंतु, आता झांझिमानमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.
आपण लहानपणी जंगल बुकमध्ये (Jungle Book) मोगलीची (Mogli) गोष्ट वाचली आहे; मात्र जगात अशा अनेक व्यक्ती आहेत, की ज्यांना खऱ्या आयुष्यातही मोगली संबोधलं जायचं. या व्यक्ती जन्मापासून जंगलात (Forest) राहत असल्याने त्यांची वर्तणूक माणसाऐवजी प्राण्यांसारखी होती. यामुळे त्या व्यक्तीची प्राण्यांशी घट्ट मैत्री झाली आणि त्या त्यांच्यातल्याच एक झाल्या होत्या. खऱ्या जीवनात प्राण्यांमध्ये राहिल्यामुळे या व्यक्ती प्राण्यांसारख्याच वागत होत्या. त्यांना जेव्हा जंगलातून पकडून आणलं गेलं तेव्हा ते जनावरांसारखे चार पायांवर चालत होते. आफ्रिकेच्या रवांडामधील झांझिमान एल्ली (Zanziman Ellie) हा त्यांच्यापैकीच एक रिअल लाइफ मोगली होता.
काही काळापूर्वी त्याची जंगलात गवत खात असतानाची छायाचित्रं समोर आली होती. आई-वडिलांनी त्याला सोडलं नव्हतं, तरी तो स्वतःच वारंवार जंगलात पळून जायचा. जन्मजात दोषामुळे झांझिमान एल्लीचा लूक (Look) इतर मुलांपेक्षा वेगळा होता. गावातल्या व्यक्ती त्याला माकड (Monkey) म्हणून चिडवायचे. या गोष्टीला चिडून तो घरातून पळून जायचा. त्याचे हावभाव बघून लोक त्याला मोगली म्हणू लागले. परंतु, आता झांझिमानमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.
प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर झांझिमान एल्लीच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनीदेखील त्याच्यावर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला. आता झांझिमान ड्रेस परिधान करून शाळेत (School) जाऊ लागला आहे. `मुलामध्ये झालेलं परिवर्तन ही एक जादू आहे,` असं त्याची आई म्हणते. एक दिवस झांझिमान एल्ली सर्वसामान्य मुलांप्रमाणे जीवन जगू शकेल, अशी कल्पना रवांडा येथे राहणाऱ्या या कुटुंबाने कधीही केली नव्हती. आजारपणामुळे त्याचं जगणं आणि स्वरूप हे सगळं काही हरवलं होतं. त्यामुळे झांझिमान एल्लीला लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते.
जेव्हा झांझिमान एल्ली चर्चेत आला तेव्हा ही गोष्ट एका चित्रपट क्रूपर्यंत (Cinema Crew) पोहोचली. त्यानंतर ही मंडळी आफ्रिकेत गेली. त्यानंतर त्यांनी झांझिमान एल्लीच्या जीवनावर आधारित एक डॉक्युमेंटरी (Documentary) बनवली. या डॉक्युमेंटरीमुळे झांझिमानचं आयुष्य बदलून गेलं. आता तो कुटुंबीयांसोबत गावात राहतो. तसंच तो शाळेत जाऊन शिक्षणही घेत आहे. ज्या मुलाला गावातले लोक चिडवत होते, तेच लोक आता त्याच्याविषयी आपुलकी व्यक्त करतात. झांझिमानमुळे त्याचं गाव जगात पोहोचलं आहे.
झांझिमान एल्लीचा जन्म 1999 मध्ये झाला होता. परंतु, विचित्र दिसण्यामुळे लोक त्याची चेष्टा करत होते. त्यामुळे तो बहुतांश वेळ जंगलात राहत असे.