सिनेमातील नाही तर टायटॅनिक जहाज बुडण्याचं 'हे' कारण खरं आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 02:25 PM2019-12-04T14:25:38+5:302019-12-04T14:42:22+5:30
जगात सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं किंवा अजूनही चर्चेत राहणारं जहाज म्हणजे टायटॅनिक. टायटॅनिक सिनेमा पाहिला नसलेला क्वचितच एखादा सापडेल.
जगात सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं किंवा अजूनही चर्चेत राहणारं जहाज म्हणजे टायटॅनिक. टायटॅनिक सिनेमा पाहिला नसलेला क्वचितच एखादा सापडेल. हा सिनेमा बघण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे यातील लव्हस्टोरी आणि दुसरं म्हणजे एवढं मोठं जहाज पाण्यात बुडालं कसं हे जाणून घेण्याची उत्सुकता. या सिनेमात जहाज बुडण्याचं जे कारण दाखवण्यात आलं आहे तेच जास्तीत जास्त लोकांना माहीत आहे. पण हे जहाज बुडालं कसं यावर अनेक लोकांनी रिसर्च केले. त्यामुळे जहाज बुडण्याची वेगवेगळी कारणे समोर आली आहेत. ही कारणे खूप आधीच समोर आली असली तरी अनेकांना ही माहीत नसतात. ती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
(Image Credit : nationalgeographic.org)
टायटॅनिक हे जहाज १० एप्रिल १९१२ रोजी इंग्लंडमधील साउथ हँप्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे सफरीला निघाले. ४ दिवसांनी १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक बुडाले, असा दावा केला जातो.
पण या दाव्याला खरं न मानणारा एक गट होता आणि त्यांनी खरं कारण शोधून काढण्यासाठी यावर रिसर्चही केला.
(Image Credit : forbes.com)
एका वेगळ्या रिसर्चनुसार, टायटॅनिक जहाजाच्या मागच्या भागात म्हणजे जिथे कोळसा ठेवला होता, तिथे मोठी आग लागली होती. ही आग जहाजातील ६ नंबरच्या बंकरमध्ये लागली होती. त्यामुळे जहाजाचा एक भाग कमजोर झाला आणि नंतर हिमनगाशी टक्कर हा भाग ढासळून जहाज पाण्यात बुडालं.
(Image Credit : goodhousekeeping.com)
जहाजाच्या मागच्या भागात दिसणाऱ्या एका मोठ्या काळ्या डागामुळे हा निष्कर्ष काढण्यात आलाय. इतकेच नाही तर जहाजावरील लोकांनी ही आग विझवण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही. असाही दावा केला जातो की, आग इतकी भयंकर होती की, तापमान १ हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं होतं. या घटनेला आधार देणारी घटना म्हणजे टायटॅनिक जहाज बनवणाऱ्या कंपनीने अध्यक्ष जे. ब्रूसने यांना ही आग लागल्याचे माहीत होते.
(Image Credit : pinterest.com)
इतकेच नाही तर त्यांनी जहाजावरील अधिकाऱ्यांना अशा आदेशही दिला होता की, या आगीबाबत कोणत्याही प्रवाशाला माहिती मिळू नये. ही आग जहाज प्रवासाला निघण्याच्या दहा दिवस आधीच लागल्याचाही दावा केला गेला आहे. त्यामुळे सिनेमात अर्धवट दाखवलं की काय असा प्रश्न उभा ठाकतो.