"700 हून अधिक पुरुषांसोबत ठेवले संबंध, पण मला लाज वाटत नाही", टीव्ही स्टारचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 09:35 AM2022-08-29T09:35:45+5:302022-08-29T09:36:58+5:30
2017 मधील प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन शो The Bachelor मधील आपल्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.
एका रिअॅलिटी टीव्ही स्टारने आपल्या सेक्स अॅडिक्शनबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने 700 हून अधिक पुरुषांसोबत शाररिक संबंध ठेवल्याचा दावा केला आहे. तसेच, या टीव्ही स्टारने असेही सांगितले आहे की, तिच्या सेक्स अॅडिक्शनबद्दल तिला कोणतीही लाज वाटत नाही. या रिअॅलिटी टीव्ही स्टारचे नाव बेलिंडा 'लव्ह' रायगियर असे आहे.
2017 मधील प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन शो The Bachelor मधील आपल्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते. तिने आपल्या आयुष्यातील एका टप्प्याबद्दल सांगितले, जेव्हा ती आठवड्यातून 6 दिवस रोमान्ससाठी जोडीदार शोधत असे. रेडिओ शो You're a Grub Mate! मध्ये 38 वर्षीय बेलिंडा म्हणाली की, "सर्व काही ठीक झाल्यानंतर मला माझ्या समस्यांबद्दल कळले. सर्वात मोठा प्रश्न माझ्या नात्याचा होता. मी वाईट माणसांच्या संगतीत होते."
बेलिंडाने 8 वर्षांपूर्वी आपल्या व्यसनावर मात केली. यानंतर ती टीव्ही स्टारपासून रिलेशनशिप गुरू बनली. ती म्हणाली, बरे झाल्यानंतर मला जाणवले की काही जुन्या अस्पर्शित जखमांमुळे माझ्यात सेक्सचे व्यसन आले होते. किती पुरुषांशी संबंध ठेवले, हे आठवत नाही, पण, ही संख्या 700 पेक्षा जास्त असेल, असे टीव्ही स्टार बेलिंडाने सांगितले.
सेक्शुअल पार्टनर्सच्या या आकड्यांमुळे मला लाज वाटत नाही. पुरुष मला त्याच गोष्टी सांगत असत ज्या मला ऐकायच्या होत्या. ते लोक या गोष्टीत खूप चांगले आहेत. सेक्सपेक्षा हे सर्व एका सुंदर भावना आणि प्रेमाच्या नावावर होते, असे बेलिंडा म्हणाली. तसेच, समाज खूप खालच्या पातळीवर जात आहे. आपण सेक्सचा वापर अत्यंत चुकीच्या अर्थाने करतोय, जो क्षणिक आनंद आहे. ज्याच्याशी मला काहीही संबंध ठेवायचे आहेत, त्याच्यासोबत मी आता खास क्षण घालवणार आहे, असेही टीव्ही स्टार बेलिंडाने सांगितले.