हिटलरच्या मिशा अशा असण्यामागचं रहस्य? खुलासा वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 09:56 AM2024-01-27T09:56:37+5:302024-01-27T09:57:46+5:30
हिटलरचे मोठमोठे डोळे आणि अजब मिशा नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. असं सांगितलं जातं की, हिटलरने या मिशा शेव्ह करण्यास मनाई केली होती.
हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरचा विषय निघाला की, कितीतरी गोष्टी समोर येतात. त्याचे अत्याचार कुणाला माहीत नसतील असं क्वचितच कुणी असेल. त्याच्या कारनाम्यांवर अनेक सिनेमे बनले आणि पुस्तके आली. त्याचे मोठमोठे डोळे आणि अजब मिशा नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. असं सांगितलं जातं की, हिटलरने या मिशा शेव्ह करण्यास मनाई केली होती.
इतकंच नाही तर त्याच्या मृत्यूच्या दिवशीही जेव्हा त्याने सोव्हिएत सैनिकांच्या हल्ल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेतली होती तेव्हाही त्याच्या मिशा व्यवस्थित ट्रिम करण्यात आल्या होत्या.
'हिटलर्स लास्ट डे: मिनट बाय मिनट' नावाच्या पुस्तकात हिटलरच्या मिशांविषयी काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
जोनाथन मेयो आणि एम्मा क्रेगी द्वारे लिखित या पुस्तकात उल्लेख आहे की, मृत्यूच्या काही सेकंदानंतर हिटलरचा न्हावी ऑगस्ट वोलेनहॉट, त्याचे केस आणि मिशा ट्रिम करण्यासाठी बेडरूममध्ये येतो.
असं सांगितलं जातं की, हिटलरच्या मिशांची ही स्टाईल त्याचं मोठं नाक झाकण्यासाठी केली जात होती. असंही म्हटलं जातं की, मिशांच्या या स्टाईलची सुरूवात अमेरिकेत झाली होती. इथे या स्टाईलला टूथब्रश स्टाईल म्हटलं जात होतं.
म्हणजे या पुस्तकातून स्पष्ट होतं की, हिटलरची ही अजब मिशांची स्टाईल त्याचं मोठं नाक झाकण्यासाठी असायची. कारण तो त्याच्या मोठ्या नाकाबाबत असुरक्षित होता.
यानंतर हिटलरच्या मिशांबाबत आणखी एक खुलासा झाला. असं समोर आलं की, हिटलर नेहमी टूथब्रश स्टाईलने मिशा ठेवत नव्हता. सुरूवातीला त्याच्या मिशा त्याच्या वडिलांसारख्या हॅंडलबार मिशा होत्या.
द वर्ल्ड वॉर्स नामक एक हिस्ट्री चॅनल शो बघितल्यावर समजलं की, हिटलरने हॅंडलबार मिशा काढून टूथब्रश स्टाईलच्या मिशा का ठेवल्या?
शोमध्ये सांगण्यात आलं की, हिटलर जेव्हा तरूण होता आणि पहिल्या महायुद्धात एक सैनिक होता, तेव्हा त्याच्या हॅंडलबार मिशांमुळे त्याला गॅस मास्क व्यवस्थित लावता येत नव्हता. ज्यामुळे त्याने या मिशा काढल्या.
शो चे कार्यकारी निर्माता स्टीफन डेविड यांनी द रॅपला सांगितलं की, त्याला मिशा काढण्याचा आदेश देण्यात आला नव्हता. पण मुळात जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा त्याने मिशा काढल्या.
दरम्यान, जर्मनीत जेव्हा नाझी पार्टीची सत्ता आली तेव्हाही हिटलरने आपल्या मिशांची स्टाईल कायम ठेवली. पहिल्या महायुद्धानंतर ही स्टाईल अशी काही ट्रेंड झाली की, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान ती फॅशन बनली होती.