मॉलमध्ये थिएटर आणि फूड कोर्ट टॉप फ्लोरवरच का बनवतात? जाणून घ्या कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 02:15 PM2021-09-28T14:15:22+5:302021-09-28T14:16:44+5:30
मित्रांसोबत पार्टीचा मूड बनला तर फूड कोर्टमध्ये बसून आरामात खाऊ-पिऊ शकता. आता तर लोकांची गरज लक्षात घेऊन शहरांमध्ये मॉल्सची संख्या वाढत आहे.
आता शहरातील वेगवेगळे मॉल्स लोकांच्या जीवनाच महत्वाचा भाग बनले आहे. खासकरून शहरी लोकांच्या. मॉल असं ठिकाण असतं जिथे तुम्ही सगळ्या प्रकारची शॉपिंग करण्यासोबतच सिनेमा बघू शकता. मित्रांसोबत पार्टीचा मूड बनला तर फूड कोर्टमध्ये बसून आरामात खाऊ-पिऊ शकता. आता तर लोकांची गरज लक्षात घेऊन शहरांमध्ये मॉल्सची संख्या वाढत आहे.
तुम्हीही अनेकदा मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत मॉल्समध्ये गेले असाल. यावेळी तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, जास्तीत जास्त मॉल्समध्ये सिनेमाघर आणि फूड कोर्ट हे टॉप फ्लोरवरच का बनवले जातात? याचं काय कारण असेल की, फूड कोर्ट आणि सिनेमाघर मॉलच्या मधल्या किंवा खालच्या फ्लोरवर नसतात? (हे पण वाचा : हे आहे जगातील सर्वात भाग्यवान घर, कारण वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास)
हे आहे कारण?
मॉलमध्ये एखाद्या व्यक्तीला काही खायचं किंवा प्यायचं असेल किंवा सिनेमा बघायचा असेल तर त्यांना टॉप फ्लोरवरच जावं लागतं. याचं कारण म्हणजे थिएटर आणि फूड कोर्टकडे जाणाऱ्या लोकांची नजर मधे लागणाऱ्या आउटलेट्स आणि दुकानांवर पडते. लोकांची त्यांवर नजर पडावी, त्यांनी शोरूममध्ये जावं आणि काहीतरी खरेदी करावं. हा यामागचा उद्देश असतो. ही एकप्रकारची मार्केटींग स्ट्रॅटेजी असते. जी खासकरून अशा लोकांसाठी तयार केली जाते ज्यांना शॉपिंग करण्यात फार इंटरेस्ट नसतो.
मॉलच्या टॉप फ्लोरवर पोहोचता पोहोचता लोक आउटलेट्सकडे आकर्षित होतात. यानंतर इच्छा नसूनही काहीना काही खरेदी करतात. असं बहुतांश लोकांसोबत होतं. नेहमीच आपण मॉलमध्ये जातो वेगळ्याच उद्देशाने. पण तेथून काहीना काही खरेदी करून बाहेर पडतो. हेच मुख्य कारण आहे की, सिनेमाघर आणि फूड कोर्ट मॉलच्या टॉप फ्लोरला असतं.