Record Clapping: तुम्ही एका मिनिटात किती टाळ्या वाजवू शकता? या तरुणाने बनवला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 05:14 PM2022-11-06T17:14:28+5:302022-11-06T17:14:45+5:30
Faster Clapper: डाल्टन मेयर नावाच्या तरुणाने एका मिनिटात सर्वाधिक टाळ्या वाजवण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
Man Claps 1140 Time In A Minute: आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकवेळा टाळ्या वाजवतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, तुम्ही दिवसभरात किंवा एका मिनिटात किती टाळ्या वाजवू शकता? एका तरुणाने हजाराचा टप्पा ओलांडत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.
एका मिनिटात 1140 टाळ्या
एका तरुणाचा टाळ्या वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर देखील पोस्ट करण्यात आला आहे. या तरुणाने टाळ्या वाजवण्याचा पराक्रम कसा केला हेही यात दिसत आहे. डाल्टन मेयर असे या तरुणाचे नाव असून, तो अमेरिकेचा रहिवासी आहे आहे. या तरुणाने एका मिनिटात तब्बल 1140 टाळ्या वाजवल्या.
मनगट आणि बोटांचा वापर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डाल्टन मेयरने हा रेकॉर्ड बनवण्यासाठी रिस्ट-क्लॅपिंग तंत्राचा वापर केला. या तंत्रात दुसऱ्या हाताच्या तळव्याला मनगट आणि बोटे वापरून टाळी वाजवावी लागते. या मुलाने मार्चमध्येच हा अनोखा विश्वविक्रम केला होता, ज्याला आता मान्यता मिळाली आहे. या विक्रमाला अधिकृत मान्यता मिळाली असून या विक्रमाचा गिनीज बुकमध्ये समावेश करण्यात आला आहे. याआधी एका मिनिटात सर्वाधिक टाळ्या वाजवण्याचा विक्रम एली बिशपच्या नावावर होता, ज्यांने एका मिनिटात 1103 टाळ्या वाजवल्या होत्या.