आयुष्यात फक्त लग्नाच्या दिवशीच पाण्याने आंघोळ करतात येथील महिला, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 05:27 PM2024-03-19T17:27:52+5:302024-03-19T17:28:20+5:30

आम्ही ज्या जमातीबाबत सांगत आहोत त्या जमातीचं नाव हिम्बा आहे. आफ्रिकेच्या दक्षिणी भागातील देश नामीबियाच्या जंगलात हे लोक राहतात.

Red colored women take bath only on their wedding day in their entire life | आयुष्यात फक्त लग्नाच्या दिवशीच पाण्याने आंघोळ करतात येथील महिला, जाणून घ्या कारण...

आयुष्यात फक्त लग्नाच्या दिवशीच पाण्याने आंघोळ करतात येथील महिला, जाणून घ्या कारण...

जगभरात अशा अनेक आदिवासी जमाती आहेत ज्या आजही जंगलात राहतात आणि आपल्या जुन्या परंपरा व रितीरिवाजांचं पालन करतात. अनेक जमातींमध्ये वेगवेगळे अजब नियम असतात. पण ते न चुकता त्यांचं पालन करतात. नामीबियामधील अशाच एका जमातीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आजही हे लोक जंगलात राहतात.

सामान्यपणे जंगलांमध्ये राहणारे हे लोक गाव आणि शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा खूप वेगळे असतात. त्यांचं राहणीमान, त्यांची संस्कृती, परंपरा फार वेगळ्या आणि अजब असतात. नामीबियातील हे लोकही खूप वेगळे आहेत. ते आजही त्यांच्या परंपरा पाळतात.

आम्ही ज्या जमातीबाबत सांगत आहोत त्या जमातीचं नाव हिम्बा आहे. आफ्रिकेच्या दक्षिणी भागातील देश नामीबियाच्या जंगलात हे लोक राहतात. त्यांच्या परंपरांबाबत लोक काय म्हणतात याचा त्यांना काही फरक पडत नाही. ते त्यांचे नियम फॉलो करतात. 

द गार्जियनच्या एका रिपोर्टनुसार, हिम्बा जमातीमधील लोक मुख्यपणे शेतकरी आहे. ते शेती करून आणि पशुपालन करून आपलं पोट भरतात. ते गायी, शेळ्या आणि मेंढ्या पाळतात. या जमातीमध्ये महिलांना महत्वाचं स्थान असतं. येथील पुरूष बाहेर राहून शिकार करतात, प्राण्यांची देखरेख करतात. तर महिला घर सांभाळतात.

लाल का दिसतात या महिला

हिम्बा जमातीमधील मुलींची लग्न कमी वयातच केली जातात. इथे पुरूषांना एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी असते. असं सांगितलं जातं की, येथील महिला केवळ लग्नाच्या दिवशीच पाण्याने आंघोळ करतात. बाकी पूर्ण आयुष्य त्या स्टीम बाथ घेतात. तसेच त्यांच्या लाल रंगाचं रहस्य नामीबियातील लाल माती आहे. 

हिम्बा लोक याच लाल मातीमध्ये जनावरांची चरबी मिक्स करून एक लेप तयार करतात आणि तो आपल्या शरीरावर लावतात. ते असं दर दोन ते तीन दिवसांनी करतात. त्यामुळे त्यांचा रंग लाल दिसतो. या लोकांचं मत आहे की, हा लेप लावल्याने त्वचा सुरक्षित राहते. याने अनेक इन्फेक्शनपासून आणि उन्हापासून बचाव होतो.

Web Title: Red colored women take bath only on their wedding day in their entire life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.