100 वर्षांपूर्वी या गावात झालं असं काही आता प्राण्यांना जाण्यासही आहे बंदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 04:38 PM2024-01-18T16:38:28+5:302024-01-18T17:25:38+5:30
या ठिकाणावर 100 वर्षाआधीपर्यंत लोक आनंदाने राहत होते. पण त्यानंतर इथे असं काही घडलं की, तिथे आता कुणालाही जाण्यास बंदी आहे.
जगभरात अशी अनेक काही गुप्त ठिकाणं असतात जिथे सर्वसामान्यांना जाण्यास बंदी असते. कारण तिथे काही धोका असतो म्हणून तिथे जाता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकणाबाबत सांगणार आहोत. या ठिकाणावर 100 वर्षाआधीपर्यंत लोक आनंदाने राहत होते. पण त्यानंतर इथे असं काही घडलं की, तिथे आता कुणालाही जाण्यास बंदी आहे. माणसंच काय तर इथे जनावरांना जाण्यासही बंदी आहे.
'जोन रोग' असं या ठिकाणाचं नाव आहे जे फ्रान्सच्या उत्तर-पूर्व परिसरात आहे. गेल्या 100 वर्षात या परिसराला फ्रान्सच्या इतर परिसरांपासून वेगळं ठेवलं आहे. जेणेकरून इथे कुणी येऊ नये. इतकेच नाही तर या ठिकाणावर जागोजागी डेंजर झोन असे बोर्डही लागले आहेत. त्यावरून इथे येणं धोकादायक आहे हे लक्षात येतं.
फ्रान्सच्या या परिसराला रेड झोन या नावानेही ओळखलं जातं. पहिल्या महायुद्धाच्या आधी इथे एकूण 9 गावे होती. या गावातील लोक शेती करून आपलं पोट भरत होते. पण युद्धात इथे इतका गोळा-बारूद आणि बॉम्ब टाकण्यात आले की, हा परिसर उध्वस्त झाला. मृतदेहांचा खच इथे पडला होता आणि मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त साहित्य पसरलं होतं.
त्यामुळे या परिसरातील जमिनच नाही तर येथील पाण्यातही विषारी तत्व मिळाले आहेत. आता संपूर्ण परिसर आणि तेथील पाणी स्वच्छ करणं तर शक्य नाही. त्यामुळे फ्रान्स सरकारने हा परिसर झोन रोग किंवा रेड झोन घोषित केला.
2004 मध्ये काही वैज्ञानिकांनी 'झोन रोग'मधील माती आणि पाण्याचं परिक्षण केलं होतं. ज्यात मोठ्या प्रमाणात आर्सेनिक आढळून आलं होतं. आर्सेनिक हा एक विषारी पदार्थ आहे. हे जर मानवाच्या शरीरात गेलं तर काही वेळातच व्यक्तीचा मृत्यू होतो.
काही लोकांच्या या ठिकाणाबाबत अंधश्रद्धाही आहेत. त्यांना वाटतं की, युद्धात मारल्या गेलेल्या लोकांच्या आत्मा इथे फिरत असतात. असो, आता त्यावेळी उध्वस्त झालेल्या 9 पैकी दोन गावांच पूर्ननिर्माण सुरू आहे. 7 गावे आता राहिली नाहीत. त्यामुळे या गावांना नो मॅन्स लॅन्ड म्हटलं जातं.