लहानसा कोळी पण चावल्यामुळे महिलेला निर्माण झाला जीवघेण्या कॅन्सरचा धोका, समोर होता मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 05:44 PM2022-08-24T17:44:58+5:302022-08-24T18:02:21+5:30
एक छोटासा कोळी फार फार तर काय करू शकणार, असंच आपल्याला वाटतं. पण तुम्ही विचारही केला नसेल इतका हा एवढासा कोळी भयंकर ठरू शकतो. याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे (Spider bite woman).
घरामध्ये कोळ्याचं घर म्हणजे कोळ्याचं जाळं असतंच. कोपऱ्यातील ही जळमटं आपण कितीही स्वच्छ केली तरी आपल्याला वारंवार दिसतात. तरी जशी आपल्याला पाल, झुरळ यांची भीती वाटते, तितकी कोळ्यांची वाटत नाही. एक छोटासा कोळी फार फार तर काय करू शकणार, असंच आपल्याला वाटतं. पण तुम्ही विचारही केला नसेल इतका हा एवढासा कोळी भयंकर ठरू शकतो. याचा प्रत्यय एका महिलेला आला आहे (Spider bite woman).
ऑस्ट्रेलियातील एका महिलेला कोळी चावला आणि तिला आता कॅन्सरचा धोका आहे. हाताला कोळी चावताच तिच्या हाताची अवस्था इतकी भयंकर झाली की तिचा हात कापण्याही वेळ ओढावली आहे. जेना एलन असं या महिलेचं नाव आहे.
28 वर्षांची जेना 2014 साली पुरात लोकांची मदत करत होती. त्यावेळी एका डब्यात तिने हात घातला आणि तिच्या हाताला कुणी तरी जोरात चावा घेतला. या डब्यात एक कोळी होता. जसा तिला कोळी चावला तसं काही वेळ तिच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यानंतर तिला उलट्या आणि जुलाब सुरू झाले. ती तात्काळ जवळच्या रुग्णालयात गेली. तिथून तिला तासाभराच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं. तिथं तिला आयसीयूत ठेवण्यात आलं. तिथं उपचार घेतल्यानंतर दोन महिने ती व्हिक्टोरियातील बेंडिगो रुग्णालयात दाखल होती. तिथं तिची स्किन ग्राफ्ट म्हणजे त्वचेची सर्जरी झाली.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार सर्जरीच्या एक वर्षानंतर तिच्या त्वचेवर डास चावल्यासारखी जखम झाली. जखम वाढत गेली आणि काही कालावधीने ती फुटली. तिने डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली तेव्हा डॉक्टरांनी तिला तिच्या हाता कॅन्सर पेशी तयार होत आहेत आणि त्या हातावर पसरत असल्याचं सांगितलं.
आता कोळी चावल्याने इतरी भयंकर अवस्था कशी काय होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर महिलेला जो कोळी चावला तो साधासुधा नाही तर विषारी आणि खतरनाक कोळी आहे.
हा रेडबॅक स्पाइडर, ज्याला ऑस्ट्रेलियन ब्लॅड विडोही म्हटलं जातं. तो चावल्यानंतर अंगदुखी, पोटात वेदना, चक्कर येणं, हार्ट रेट वाढणं, बेशुद्ध होणं अशी लक्षणं दिसून येतात. हा कोळी चावल्यानंतर लगेच अँटीव्हेनमची गरज पडते. जिथं या महिलेला पहिल्यांदा दाखल करण्यात आलं तिथं हे अँटिव्हेनम नव्हतं. म्हणून तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं.