६० सेकंदांत २१२ अक्रोड फोडण्याचा रेड्डींचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:23 AM2017-11-02T03:23:42+5:302017-11-02T03:24:07+5:30
आंध्र प्रदेशातील प्रभाकर रेड्डी (३५) यांनी एका मिनिटात हाताने २०० अक्रोड फोडण्याचा जागतिक विक्रम केला. रेड्डी हे मार्शल आर्टमध्ये मास्टर आहेत. या विक्रमाचा व्हिडिओ यू ट्यूबवर गिनेज वर्ल्ड रेकॉर्डसने टाकला आहे.
आंध्र प्रदेशातील प्रभाकर रेड्डी (३५) यांनी एका मिनिटात हाताने २०० अक्रोड फोडण्याचा जागतिक विक्रम केला. रेड्डी हे मार्शल आर्टमध्ये मास्टर आहेत. या विक्रमाचा व्हिडिओ यू ट्यूबवर गिनेज वर्ल्ड रेकॉर्डसने टाकला आहे. त्यांनी २१२ अक्रोड ६० सेकंदांत फोडले. अक्रोड लांब लाकडी टेबलवर रांगांमध्ये ठेवले होते. टेबलवर ठेवलेले अक्रोड हे विशिष्ट रांगांमध्ये, कच्चे व कोणतीही हानी न झालेले आहेत याची खात्री स्वतंत्र साक्षीदारांकडून करून घेण्यात आली होती. अक्रोडच्या कवचाचे किमान दोन तरी तुकडे झाले पाहिजेत अशी अट होती. हा विक्रम करायच्या आधी मी रोज त्याचा सराव करायचो, असे रेड्डी यांनी गिनेस वर्ल्ड रेकॉर्डसला सांगितले. यापूर्वी रेड्डी यांच्याच नावावर २१० अक्रोड फोडण्याचा विक्रम होता. पाकिस्तानच्या मुहम्मद राशीद याने २१० अक्रोड फोडण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. आता परत रेड्डी यांच्याच नावावर नवा विक्रम नोंदला गेला आहे.